मुलाच्या इच्छेपोटी आईने केली ६ वर्षांच्या मुलीची हत्या; हिंदी बोलल्याचीही ‘शिक्षा’

28 Dec 2025 10:35:17
मुंबई,  
mother-murdered-her-daughter-in-mumbai महाराष्ट्रातील नवी मुंबईतून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. येथे एका आईने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीची  हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस तपासात समोर आलेल्या बाबी समाजातील मानसिकता, भाषिक दबाव आणि पालकत्वावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या आहेत. प्राथमिक तपासानुसार, आरोपी महिला मुलगा न झाल्याची खंत आणि मुलगी मराठी बोलू शकत नसल्यामुळे नाराज होती. ती मुलगी केवळ हिंदीतच बोलत होती, यामुळेही आईमध्ये असंतोष होता.
 
mother-murdered-her-daughter-in-mumbai
 
ही घटना कलंबोली परिसरातील आहे. mother-murdered-her-daughter-in-mumbai पोलिसांच्या माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपी महिला आपल्या पतीसोबत राहत होती. २३ डिसेंबर रोजी ती आपल्या मुलीला रुग्णालयात घेऊन गेली आणि डॉक्टरांना सांगितले की तब्येतीच्या तक्रारीमुळे मुलगी अचानक बेशुद्ध पडली. मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केले. मृत्यूची परिस्थिती संशयास्पद वाटल्याने रुग्णालयाने तात्काळ पोलिसांना कळवले. सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली होती. मात्र शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. अहवालात मुलीचा मृत्यू नैसर्गिक नसून तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी हत्या प्रकरण दाखल करून आईची कसून चौकशी सुरू केली. पोलिस चौकशीत आरोपी महिलेने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांच्या माहितीनुसार, तिने हत्या करण्यामागे तीन प्रमुख कारणे सांगितली. तिला मुलगा हवा होता आणि मुलगी झाल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या असमाधानी होती. तसेच मुलगी मराठी बोलत नसल्याने आणि केवळ हिंदीच बोलत असल्याने ती चिडचिडी होत होती. याशिवाय आरोपी महिलेवर नैराश्याचे उपचार सुरू होते आणि त्यामुळे ती लहानसहान गोष्टींवरही तीव्र तणावाखाली जात होती.
कलंबोली पोलिस ठाण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून स्थानिक न्यायालयाने तिला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. mother-murdered-her-daughter-in-mumbai या भयंकर गुन्ह्यात अन्य कोणाचा सहभाग आहे का, की हा केवळ महिलेच्या मानसिक अस्थैर्याचा परिणाम आहे, याचा पोलिस पुढील तपास करत आहेत.
Powered By Sangraha 9.0