नागपूर,
nagpur-weather : उत्तर भारतासह देशाच्या अनेक भागांमध्ये थंडीची लाट पसरली असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भात कडाक्याची थंडी कायम आहे. गेल्या २४ तासांत थंड आणि कोरडे हवामान होते, तर काही ठिकाणी धुक्याची चादर होती. अनेक भागांमध्ये किमान तापमानात मोठी घट झाली असून, ९.८ अंश सेल्सिअस तापमानासह तर २८.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले. अनेक भागांमध्ये किमान तापमान ९ ते १२ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. रविवारी सुध्दा थंड हवेमुळे गारठा वाढला आहे. थंडीची लाट पुढील आठवडाभर कायम राहण्याची शक्यता असून, किमान तापमानात मोठा बदल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुख्यत: राजधानी सकाळीही दाट धुक्याने वेढल्यामुळे नागपूर विमान सेवेला फटका बसला आहे. हवेची गुणवत्ता ’अत्यंत खराब’ श्रेणीतच असल्याने अनेक विमान रद्द करावी लागत आहे. उत्तर भारतात दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, याचा फटका मध्यवर्ती नागपूर मार्गे धावणार्या रेल्वे वाहतुकीला बसला आहे. राजधानी, दुरांतो आणि तेजससारख्या प्रीमियम रेल्वेही काही तास विलंबाने असल्यामुळे रेल्वेस्थानकांवर गर्दी उसळली होती. कडाक्याची थंडी आणि धुक्यामुळे दिल्ली ते नागपूर विमान प्रवास विलंबाने होत आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने अनेक उड्डाणे रद्द करावी लागत आहे.