तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
priyadarshini-uike : नगरपरिषद प्रशासकीय कारकीर्द काळात प्रचंड अंधाधुंद कारभार सुरू होता. याची अनेक उदाहरणे आहेत. नगर विकासाच्या दृष्टीने कुठलेच कार्य न करता नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करत, कराच्या रूपात नगरपरिषद नागरिकांकडून पैसा संकलित करीत आहे. नागरिकांना शहरात घर किंवा सदनिका खरेदी केल्यानंतर फेरफार करावयाचा झाल्यास नगरपरिषद खरेदीवर 1 टक्का कर आकारते. यामुळे सामान्य नागरिकांची आर्थिक पिळणूक होत आहे. खरेदीवरील हा एक टक्का तत्काळ बंद करण्यात यावा, अशी मागणी नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
यवतमाळ नगरपरिषद गेल्या तीन वर्षापासून म्हणजे 18 जानेवारी 22 ला नगरपरिषदेचा कारभार प्रशासकाकडे आला. तेव्हा प्रशासकाने एका ठरावाद्वारे खरेदीवर 1 टक्का कर अशी तरतूद करून घेतली. सारा कारभार प्रशासकाच्या अख्त्यारीत असल्याने अशा कर वाढीला, विरोध कोणीच करू शकले नाही.
सदनिका आणि घर खरेदीवरील हा एक टक्का कर रद्द करावा. ही बाब नगरविकासामध्ये आपली प्रमुख भूमिका वठविणाèया, क्रेडाई या संस्थेच्या पदाधिकाèयांनी हेरली आणि नवनिर्वाचीत नगराध्यक्ष अॅड. प्रियदर्शिनी उईके यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
तसे लेखी निवेदन त्यांना देण्यात आले आहे. यावर त्यांनी सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पदाधिकाèयांना दिले. क्रेडाई पदाधिकाèयांच्या शिष्टमंडळात अध्यक्ष अभियंता संजय ठाकरे, सचिव हर्षल जायले, कोषाध्यक्ष अतुल देशपांडे, प्रवीण खांदवे व घनश्याम बागडी उपस्थित होते.