स्वहित जोपासणाऱ्या पुढाऱ्यांमुळेच भाजपाची पिछेहाट

28 Dec 2025 20:37:03
रवी देशपांडे
पुसद, 
pusad-news : भाजपाच्या स्वहित जोपासणाèया पुढाèयांनी पुसद नगर परिषदेच्या राजकारणातील अव्वल स्थान घालवले आणि पक्षाची प्रचंड पिछेहाट झाली. 2024 मध्ये झालेल्या पुसद विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार (राष्ट्रवादी अप, शिंदे सेना व भाजपा) इंद्रनील नाईक यांचा विक्रमी 93 हजारांचे मताधिक्य घेऊन विजय झाला.
 
 

BJP 
 
 
नाईकांनी 2 हजार 200 मतांच्या आघाडीपासून मजल मारली. एवढे मताधिक्य भाजपामुळेच झाले असा प्रचार करण्यात आला. महायुती पुसद नगर परिषद निवडणुकीतही कायम राहील असा भाजपा पुढाèयांचा विश्वास होता. परंतु अध्यक्षपदासाठी नाईकांनी नगर परिषद निवडणुकीत ‘सुनबाईंना’ उतरवले. इकडे भाजपातील एका गटाने मुनगंटीवार यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि निखिल चिद्दरवार यांच्यासाठी शब्द मिळविला.
 
 
त्यामुळे पुसद भाजपाच्या सक्रीय पुढाèयांची कोंडी झाली. मागील नगर परिषद निवडणुकीत अनिता मनोहर नाईक (14 हजार 87 मते) यांना काट्याची टक्कर देणाèया अर्चना आश्विन जयस्वाल (12 हजार887 मते) यांचा केवळ 1 हजार 900 मतांनी पराभव झाला होता. परंतु नगर परिषदेत भाजपाचे 10 सदस्य निवडून आले होते. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निखील चिद्दरवार यांना केवळ 8 हजार 504 मतांवर समाधान मानावे लागले आणि नगर परिषद सदस्यांची संख्या निम्म्याने घटली. भाजपाच्या स्वहीत जोपासणाèया तमाम पुढाèयांनी पुसद भाजपाला तिसèया क्रमांकावर नेवून ठेवले.
 
 
मागील नप निवडणुकीत काँग्रेसचा क्रमांक शोधावा लागे. त्या काँग्रेसला डॉ. महंमद नदीम (12 हजार 351मते) यांच्या उमेदवारीमुळे फायदा झाला आणि महाविकास आघाडीच्या साह्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अत्यंत चुरशीची लढत झाली. नपच्या राजकारणात उलटफेर झाला काँग्रेस दुसèया तर भाजपा तिसèया क्रमांकावर फेकल्या गेली.
 
 
या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक (13 हजार 19 मते) यांचा अवघ्या 668 मतांनी विजय झाला. हा विजय नसून नैतिक पराभव मानल्या जात आहे. दुसरे वैशिष्ट्य असे की, पुसदमध्ये विरोधी पक्ष म्हणून शिवसेना होती, त्या दोन्ही सेनेचे तीनतेरा वाजले आहे.
Powered By Sangraha 9.0