वर्धा,
lymphoma वेळीच निदान, कॅन्सरवरील अचूक उपचार आणि तज्ज्ञांच्या संयुत प्रयत्नांमुळे वर्धेतील सिद्धार्थ गुप्ता मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथे १६ वर्षीय मुलीला प्राथमिक मीडियास्टिनल बी-सेल लिम्फोमा या दुर्मिळ व आक्रमक रत कर्करोगातून पूर्णपणे बरा झाला आहे. ही एक उल्लेखनीय वैद्यकीय कामगिरी ठरली आहे.
एमपीबीसीएल lymphoma हा कर्करोग छातीच्या मध्यभागी होतो. तो वेगाने वाढतो आणि महत्त्वाच्या अवयवांवर दाब टाकतो. २०२५ च्या सुरूवातीला या मुलीला तीव्र थकवा, मानेला सूज आणि श्वास घेण्यास त्रास, अशी लक्षणे दिसून आली. छातीतील मोठ्या गाठीमुळे हा त्रास होत होता. तत्काळ उपचारांची गरज ओळखून रुग्णालयातील कॅन्सर तज्ज्ञांनी जलद तपासण्या केल्या. कोर नीडल बायोप्सी व आयएचपी तपासणीत सीडी २०- पॉझिटिव्ह बी-सेल लिम्फोमा (दुर्मिळ कर्करोग) असल्याचे निष्पन्न झाले. पीईटी-सीटी स्कॅनमध्ये छातीतील मोठी गाठ तसेच मान, टॉन्सिल्स, फुफ्फुसे, अॅड्रिनल ग्रंथी, मूत्रपिंड आणि अस्थिमज्जा यांपर्यंत आजार पसरल्याचे दिसून आले. त्यामुळे आजार स्टेज ४ एमपीबीसीएल असल्याचे स्पष्ट झाले.
आजार प्रगत अवस्थेत असतानाही डॉटरांनी आर-डीए-ईपीओसीएच ही आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य असलेली केमोथेरपी सुरू केली. हा ९६ तासांचा सलग उपचार असून, संशोधनानुसार यामुळे ९० टयांहून अधिक रुग्णांमध्ये दीर्घकाळ रोगमुती मिळते आणि अनेकदा रेडिएशनची गरज टळते.तीन केमोथेरपी सायकलनंतर केलेल्या पीईटी-सीटी मध्ये कॅन्सर पूर्णपणे नाहीसा झाल्याचे दिसून आले. रुग्णाची लक्षणे कमी झाली, श्वासोच्छवास सामान्य झाला आणि ती दैनंदिन जीवनाकडे परतली. सध्या ती एकूण सहा सायकल पूर्ण करण्याच्या उपचारात असून, दीर्घकालीन बरेपणाचा उद्देश आहे.
या यशात सहायक प्राध्यापक डॉ. प्रज्ञा मोडक आणि डॉ. आदित्य भगवत यांची प्रमुख भूमिका राहिली. त्यांना कन्सल्टंट हेमॅटोलॉजिस्ट डॉ. राहुल अरोरा, तसेच समर्पित नर्सिंग स्टाफ आणि डीएम प्रशिक्षणार्थी यांचे २४ तासांचे सहकार्य लाभले.रुग्णाच्या धैर्यामुळे आणि नियोजित, अचूक उपचारांमुळे आम्ही हा आक्रमक आजारावर मात करू शकलो. योग्य वेळी उपचार आणि तज्ज्ञांचे समन्वय असतील तर तरुणांमधील कॅन्सरही पूर्ण बरा होऊ शकतो. हा यशस्वी उपचार आंतरराष्ट्रीय संशोधनाशी सुसंगत असून, तरुण रुग्णांसाठी केमोथेरपीवर आधारित सुरक्षित व परिणामकारक उपचार अधोरेखित करतो, असे डॉ. मोडक आणि डॉ. भगवत यांनी सांगितले.