नव्यानेच बांधलेल्या उड्डाणपुलाला पडल्या भेगा

28 Dec 2025 19:45:44
कारंजा (घा.), 
Cracks in the flyover : येथील राष्ट्रीय महामार्गावर नव्यानेच बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतींना बसस्थानक परिसराजवळ लक्षणीय भेगा पडल्या आहेत. नव्यानेच बांधण्यात आलेल्या या पुलाला भेगा पडल्यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर तसेच सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाला पडलेल्या भेगांमुळे भाविष्यात मोठा अपघात घडण्याची शयताही वर्तविण्यात येत असून नागरिकांनी याबाबत चिंता व्यत केली आहे.
 
 
 
KARANJA
 
 
 
या उड्डाणपुलाचे बांधकाम अलिकडेच झाले आहे. सुरूवातीच्या टप्प्यातच अशा भेगा पडल्याने बांधकामाच्या गुणवत्तेबाबत आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बसस्थानक परिसरात दिवसभर पादचारी, प्रवासी आणि जड वाहनांची मोठी गर्दी असते. जर उड्डाणपुलाची त्वरित तपासणी आणि आवश्यक दुरुस्ती केली गेली नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शयता नाकारता येत नाही.
 
 
उड्डाणपुलाच्या भिंतीवर झाडे वाढली आहेत, भिंतीच्या प्लेटमध्ये गॅप पडत आहे, त्याकडे सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. उड्डाणपुलाखालील परिसराचे सौंदर्यीकरण करण्याच्या हेतूने लाखो रुपये खर्च करून वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतु, कंट्रशन कंपनीने त्या झाडांची देखभाल केली नाही. जांडू कंस्ट्रशन कंपनीने पुढील ६ वर्ष उड्डाणपुलाची देखरेख करणे अनिवार्य असून सुद्धा कंस्ट्रशन कंपनीचे याकडे दुर्लक्ष आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकार्‍यांनी सार्वजनिक सुरक्षेला प्राधान्य देऊन उड्डाणपुलाच्या गुणवत्तेबाबत त्वरित दखल घ्यावी, सखोल तांत्रिक तपासणी करावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने दुरुस्ती आणि मजबुतीकरणाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
 
 
सदर उड्डाणपुलाचे काम जांडू कंस्ट्रशन कंपनीने केले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुलाचे स्ट्रचरल ऑडिट करावे, बांधकामातील उणिवा शोधून दुरुस्ती करावी, अशी मागणी कारंजा नागरी समस्या संघर्ष समितीचे अध्यक्ष विभाकर ढोले यांनी केली आहे.
 
बसस्थानक समोरील उड्डाणपुलाला तडे गेलेले आहे. सिमेंट काँक्रिटचा भाग कधीही कुणाच्याही अंगावर कोसळून जीवितहानी होऊ शकते. या प्रकाराकडे शहरातील नेत्यांनी आणि प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी चंद्रशेखर जसूतकर यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0