खाली ५० हजार वर ३६ हजारांतच गुंडाळले

28 Dec 2025 19:35:43
फिरता फिरता
प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
wardha-municipal-elections : गेल्या आठ वर्षात नगर पालिकेच्या निवडणुका न झाल्याने इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून उभे होते. वर्धा जिल्हा पूर्वीच्या काँग्रेस प्रमाणे भाजपाचा गड झाला असल्याने इथे पक्षातील कार्यकर्तेच नव्हे तर जाहीरपणे पक्षावर तोंड सुख घेणारेही तिकिटासाठी आस लाऊन होते. त्यामुळे तिकीट मिळवण्यासाठी काहींना सोडून टाके तोडावे लागले. काहींना नकळत तिकीट मिळाले. मात्र, सहज तिकीट मिळालेल्या भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निलेश किटे यांना स्वतःच्या प्रभागातही लीड मिळवता आला नाही. नगरसेवक मिळून ५० हजार ६२० तर किटे यांना फक्त ३६ हजार ३५८ मतं मिळाली.
 
 
 
ELECTION
 
 
 
वर्धेत या नगरपालिका निवडणुकीत तशी मजाच नव्हती. उमेदवारी जाहीर आणि खेळ खल्लास असे चित्र तयार झाले होते. मतदानापर्यंत फक्त चर्चाच होती. मतदारांनी मात्र आपली भूमिका इव्हिएमच्या ताब्यात देऊन चिंधीफाड कार्यक्रम सुरू केला आणि मतं मोजणीत निकालात जनतेने जे ठरवले होते तेच प्रसूत झाले. वर्धेत ४० प्रभागात भाजपाचे नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे होते. या सर्व उमेदवार मिळून ५० हजार ६२० मतं मिळवली तर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला फक्त ३६ हजार ३५८ मतांमध्ये गुंडाळले. याचा अर्थ मतदारांना भारतीय जनता पार्टीविषयी तिळमात्र नाराजी नव्हती.
 
 
वर्धेत नाममात्र असलेल्या काँग्रेसचे उमेदवार सुधीर पांगूळ यांनी केलेली हिम्मतीला मतदारांनी ताकद दिली. परिणामी सत्ताधारी पक्षाचे उमेदवार पराभूत झाला. एवढेच नव्हे तर स्व प्रभागातही मान वर करता आली नाही. प्रभाग १ मधील चार बुथवर भाजपा आणि काँग्रेसची तुलनात्मक आकडेवारी डोळे उघडल्याशिवाय राहत नाही. बुथ १ वर किटे यांना २४८ तर पांगूळ यांना २४५, बुथ २ किटे २५६- पांगुळ २१७, बुथ ३ वर किटे २६२- पांगुळ २८१, बुथ ४ वर २५९ किटे तर पांगुळ यांना २२३ मतं मिळाली. त्यामुळे भाजपाच्या परमपरागत मतदारांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला सपशेल नाकारले. त्यामुळे शहरातील अनेक जन जेवण वा पैशांच्या होड जिंकले. त्याच्या जेवणावळी आता सुरू झालल्याचे फिरता फिरता कळले.
Powered By Sangraha 9.0