मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत; (उद्योग समस्यांवर उपाययोजनांचीआकाश अग्रवाल यांची मागणी )

28 Dec 2025 13:02:07
गडचिरोली,
chief minister fadnavis गडचिरोली ता. भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष आकाश अग्रवाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत करत जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रातील अडचणी, समस्या आणि आवश्यक उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली. उद्योगांना गती देण्यासाठी शासनस्तरावर तातडीने निर्णय व्हावेत, रोजगारनिर्मितीला चालना मिळावी व उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी अग्रवाल यांनी मुख्यमंत्र्यांसमोर स्पष्ट भूमिका मांडली.
 

फडणवीस  
 
 
अग्रवाल हे जिल्ह्यातील उद्योगांच्या वाढीशी संबंधित प्रश्नांवर सातत्याने काम करत असून, शासनाशी संवाद साधून समस्यांचे समाधान शोधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. उद्योगविकासाला पोषक वातावरण, पायाभूत सुविधा, शासकीय योजनांचा योग्य लाभ, परवानग्यांची सुलभ प्रक्रिया अशा विविध मुद्द्यांवरही या भेटीत चर्चा झाली. या भेटीला सहकार महर्षी तथा भाजपचे जेष्ठ नेते अरविंद सावकार पोरेड्डीवार, सहकार नेते प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, नवनिर्वाचित नगराध्यक्ष लता सुंदरकर, नरेश विठ्ठलानी, मोती कुकरेजा, मुरलीधर सुंदरकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे आदी मान्यवर उपस्थित होते.chief minister fadnavis आरमोरी मतदारसंघातील स्थानिक प्रश्नांचा आढावा घेत पुढील काळात समन्वय वाढवून ठोस उपाययोजना करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला. उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, असा विश्वास या भेटीनंतर व्यक्त करण्यात आला.
Powered By Sangraha 9.0