बँक प्रतिनिधीसाठी प्रणिता विवेक परडखे यांची निवड

28 Dec 2025 20:46:35
तभा वृत्तसेवा
बाभुळगाव, 
pranita-paradkhe : वीरखेड ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सभा 24 डिसेंबरला पार पडली. यावेळी बँक प्रतिनिधी म्हणून प्रणिता विवेक परडखे यांची निवड करण्यात आली.
 

y28Dec-Pranita-Pardakhe 
 
यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ संपत असून 2025 ते 2030 या कार्यकाळासाठी संचालक मंडळाची निवडणूक होणार आहे. त्या दृष्टीने मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायटीतून एका प्रतिनिधीचे नाव पाठवण्याचे पत्र राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण पुणे यांच्याकडून प्राप्त झाले.
 
 
त्या अनुषंगाने विभागीय सहकारी सहायक निबंधक अमरावती यांनी विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष, सचिव यांना पत्र पाठवून 31 डिसेबरपर्यंत प्रत्येक सोसायटीतून एका प्रतिनिधीची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार वीरखेड ग्रामविविध कार्यकारी सहकारी सोसायटीची सभा 24 डिसेंबर रोजी पार पडली. यात प्रणिता विवेक परडखे यांची निवड करण्यात आली.
 
 
या सभेला ग्रामविविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष अंकुश परडखे, उपाध्यक्ष चंद्रशेखर झपाटे, संचालक दीपक चौधरी, विवेक परडखे, वंदना विजय परडखे, अलका शरद परडखे, मनोहर गुबरे, किरण पेंदोर, सुनील बुल्लेे, प्रफुल परडखे, चंद्रकांत परडखे उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0