तभा वृत्तसेवा
राळेगाव,
ashok-uike : क्रीडा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. खेळातून शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण आणि जिंकण्याची सकारात्मक वृत्ती निर्माण होते. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली क्रीडाक्षमता अशा स्पर्धांच्या माध्यमातून उजागर होते. ही बाब अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले.
ते तालुक्यातील जळका येथील प्रतिभा आश्रमशाळेत खेळ व कला संवर्धन मंडळ पंचायत समिती राळेगाव अंतर्गत आयोजित तालुकास्तर शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या उद्घाटन समारंभाला तहसीलदार अमित भोईटे, गटविकास अधिकारी केशव पवार, भाजपा जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुलसिंह चौहान, चित्तरंजन कोल्हे, लोकविकास संस्था सचिव संकेत राजगडकर, सरपंच सुशीला शेराम, उषा भोयर, शीला सलामे, उपसरपंच संजय पांडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवी डवरे, उपाध्यक्ष सोनाली आडे, छाया पिंपरेसह अनेक मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कब-बुलबुल उत्सव सांघिक व वैयक्तिक खेळ यात विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत व्हावा त्यांच्या उपजत गुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जळका येथे करण्यात आले होते. या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा बक्षीस वितरण सोहळा शनिवार, 27 डिसेंबर रोजी पार पडला.
तालुकास्तर शालेय खेळ व क्रीडा स्पर्धेचा हा तीन दिवसीय महोत्सव गटविकास अधिकारी केशव पवार, सहा. गटविकास अधिकारी भारती इसाळ, गटशिक्षणाधिकारी नवनाथ लहाने, विस्तार अधिकारी निलेश दाभाडे यांच्या मार्गदर्शनात झाला.
कार्यक्रमासाठी जळका, राळेगाव केंद्रप्रमुख डॉ. कल्पना डवले, खैरी केंदप्रमुख हरिदास वैरागडे, वाढोणा केंद्रप्रमुख संजय पांडे, सावरखेडा केंदप्रमुख मुकेश भोयर, धानोरा केंदप्रमुख दीपेश शेंडे, क्रीडासचिव सागर इंझळकर, जिप शाळा जळका मुख्याध्यापक जगदीश ठाकरे, इतर मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले.