अमरावतीत महायुतीचे ठरले! भाजपा ५३, शिवसेना १६, वायएसपी ६

29 Dec 2025 21:52:06
अमरावती,
 
Amaravati-amc-election येथील महापालिका निवडणूक महायुतीत लढण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार भाजपा ५३, शिंदे शिवसेना १६ व युवा स्वाभिमान पार्टी ६ जागा लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. याची अधिकृत घोषणा मंगळवारी दुपारनंतर होण्याची शक्यता आहे. काल तुटण्याच्या स्थितीत आलेली महायुती मंत्री संजय राठोड यांच्या मध्यस्थीने बचावली. सोमवारी खुद्द संजय राठोडच विशेष विमानाने अमरावतीत आले. त्यानंतर महायुतीतल्या जागावाटपाची चर्चा सुरू झाली. सर्वप्रथम त्यांनी शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेऊन त्यांचे म्हणणे जाणून घेतले.
 
 
 
 
amaravati-amc-election
 (संग्रहित आदमी)
 
 
Amaravati-amc-election त्यानंतर ते व संजय रायमुलकर, अभिजीत अडसूळ चर्चा करण्यासाठी हॉटेल रुद्राक्ष येथे गेले. तेथे भाजपाच्या पदाधिकार्‍यांसोबत त्यांनी चर्चा केली. ही चर्चा संध्याकाळपर्यंत सुरू होती. तेथून संजय राठोड परत हॉटेल मैफीलवर आले. त्यांनी झालेल्या चर्चेचा तपशील शिवसेना पदाधिकार्‍यांना सांगितला. जी माहिती सुत्रांकडून समोर आली, त्यानुसार शिवसेना १६ जागेवर लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले असून महायुतीतला आणखी एक पक्ष युवा स्वाभिमानला ६ जागा देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपा ५३ जागा लढविणार आहे. मनपाच्या एकूण जागा ८७ आहे.
 
 
 
Amaravati-amc-election त्यापैकी ७५ जागांवरच महायुतीची लढण्याची तयारी सुरू आहे. उर्वरीत १२ जागा या मुस्लिम बहुल असल्यामुळे भाजपा तेथे उमेदवार उभे करत नाही. गेल्या निवडणुकीतही त्यांनी तेथे उमदेवार दिले नव्हते. या १२ जागांपैकी ४ जागा शिंदेसेना लढू शकते, अशी पण एक माहिती मिळाली आहे. अशा स्थितीत त्यांची उमेदवार लढण्याची संख्या २० होऊ शकते. महायुतीत निवडणूक लढण्याचे पक्के झाले आहे. जागावाटपाची अधिकृत घोषणा मंगळवारी होईल.
 
Amaravati-amc-election शिवसेना शिंदे गटाचे पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख आणि माजी मंत्री जगदीश गुप्ता सोमवारी सांयकाळी मंत्री संजय राठोड व अन्य पदाधिकार्‍यांसोबतची बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडले. शिंदेसेनेतल्या पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी ‘जय श्रीराम’ म्हणत नाराजी व्यक्त केली. आपली स्वतंत्र भूमिका मंगळवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीच्या जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मंत्री संजय राठोड यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तेच शिंदेसेनेला किती जागा मिळाल्या याची माहिती देऊ शकतात. ती देण्याचा अधिकार माझ्याकडे नाही. मात्र, मंगळवारी सकाळी मी सर्वकाही सविस्तर सांगणार आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करा, असे त्यांनी सांगितले. माहितीनुसार ते शिंदेसेनेला जय महाराष्ट्र करून स्वतंत्र पॅनल मैदानात उतरवू शकतात.
Powered By Sangraha 9.0