भीमा कोरेगाव शौर्यदिनी योद्ध्यांना देणार मानवंदना

29 Dec 2025 21:30:13
वर्धा, 
 
bhima-koregaon-wardha १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव हा शौर्य दिनानिमित्त महान योद्ध्यांना मानवंदना देण्यात येणार आहे. शहरा नजिक नालवाडी येथे भीमा कोरेगाव शौर्यस्तंभाची ३५ फूट उंच प्रतिकृती उभारण्यात आली आहे. वर्धेतही १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील लढाईत हुतात्मा झालेल्या महान योद्ध्यांना विविध कार्यक्रमाने मानवंदना देणार असल्याची माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष विशाल मानकर यांची आज सोमवार २९ रोजी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
 
 

bhima-koregaon-wardha 
 
 
 
bhima-koregaon-wardha विशाल मानकर पुढे म्हणाले की, भारतीय बौद्ध महासभा, बुद्ध लॉन नालवाडी आणि संघदीप शैक्षणिक व सामाजिक मंडळाच्या वतीने आठ वर्षांपासून भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सिव्हील लाईन येथून मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सदर रॅलीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातून सुरूवात होऊन बजाज चौक, शिवाजी चौक, आर्वी नाका, धुनिवाले चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नालवाडी आणि नंतर धम्मकुटी येथील स्तंभाकडे पायदळ मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीचे महिला व माजी सैनिक (महार बटालियन) यांच्या नेतृत्त्वात आयोजन करण्यात आले असून ७५ माजी सैनिकांसह भिक्खू संघाची संविधान झाँकी या रॅलीत सहभागी होणार आहे.
 
 
 
bhima-koregaon-wardha रॅली धुनिवाले चौकात आल्यानंतर शौर्यस्तंभ बुद्ध लॉन नालवाडीपर्यंत मशाल मार्चचेही आयोजन असून त्यानंतर समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. या रॅलीचा समारोप भिखू संघाद्बारे बुद्ध वंदनेने होणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी मानवंदना देण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. १ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बुद्ध लॉन, नालवाडी येथे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांचा जल्लोष शौर्यदिनाचा हा संगीतमय कार्यक्रम होईल, अशी माहितीही मानकर यांनी यावेळी दिली. पत्रकार परिषदेला प्रीती मानकर, कॅप्टन संजय कांबळे, धर्मपाल ताकसांडे, दिनेश धनवीज, वर्षा थूल, धर्मदास मानकर, अ‍ॅड. ज्योती कोमलकर, नालंदा कांबळे, सुहास थूल, पंचशिला बोरकर, अर्चना नाखले, विशाखा गुजर आदींची उपस्थिती होती.
Powered By Sangraha 9.0