हिमांशु भारद्वाज व रामकृष्ण सुंचू यांना न्यायालयीन कोठडी

29 Dec 2025 21:41:58
चंद्रपूर, 
 
chandrapur-kidney-farmer किडनी विक्रीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू (36) उर्फ ‘डॉ. क्रिष्णा’ तसेच आरोपी हिमांशु भारद्वाज या दोघांचीही पोलिस कोठडी संपली असून, न्यायालयाने सोमवार, 29 डिसेंबर रोजी त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
 
 
 
chandrapur-kidney-farmer
 (फोटो इंटरनेटवरून साभार)
 
chandrapur-kidney-farmer नागभीड तालुक्यातील मिंथुर येथील तरूण शेतकरी रोशन शिवदास कुळे यांनी सावकारी कर्जापायी आपली किडनी कंबोडियात विकली होती. हे प्रकरण उघडकीस येताच, ब्रम्हपुरी पोलिसांनी कर्जदारांची अमानुष पद्धतीने आर्थिक, मानसिक व शारीरिक पिळवणूक केल्याप्रकरणी 6 अवैध सावकरांविरोधात गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. तपासादरम्यान किडनी विक्रीचे रॅकेट देशाबाहेरीही सक्रिय असल्याचे पुढे आले. या प्रकरणातील मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू जो, ‘डॉ. क्रिष्णा’ नावाने पीडितांच्या संपर्कात होता.
 
 
chandrapur-kidney-farmer त्याला सोलापूर येथून पोलिसांनी अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला 29 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आता त्याची पोलिस कोठडी संपताच न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.  तसेच कंबोडियात किडनी विक्रीसाठी पीडितांना सोबत करणारा आरोपी हिमांशु भारद्वाज यालाही पोलिसांनी पंजाब राज्यातील चंदीगढ येथून अटक केली होती. 29 डिसेंबर रोजी त्यांचीही पोलिस कोठडी संपली असता, त्यालादेखील न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0