मुंबई,
sex racket exposed दक्षिण मुंबईतील डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी एका धक्कादायक घटनेचा उलगडा झाला आहे. येथे एका व्यक्तीने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या पुरुषांना अडवत त्यांच्या समोर काही मुलींचे फोटो दाखवले आणि व्हॉट्सअॅपद्वारेही ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून संपर्क साधत होता. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच सापळा रचून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले.
आरोपीचे नाव sex racket exposed मुकेश कुमार रामजी यादव (५०) असून त्याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान पोलिसांना हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा उघड झाला आहे. पोलिसांनी माहिती मिळवली की, मुकेश यादव हा दलाल म्हणून काम करत असून मुलींना देहव्यवसायात प्रवृत्त करून ग्राहकांसोबत संपर्क साधत होता. या दलालीतून त्याला मोठा आर्थिक फायदा होत होता.डी. बी. मार्ग पोलीस पथकाने दयानंद बिल्डिंग परिसरात सापळा रचून आरोपीला पकडले. चौकशीदरम्यान मुकेश यादवने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलिस आता तपासात या नेटवर्कमध्ये त्यासोबत आणखी कोण जोडलेले आहे, तसेच मुलींना कुठून देहव्यवसायात ओढण्यात येत होते, याचा सखोल शोध घेत आहेत.पोलिसांचा असा अंदाज आहे की, हा रॅकेट हाय प्रोफाईल असून मोठ्या आर्थिक आणि सामाजिक गुंतागुंतीशी संबंधित आहे. पुढील तपासातून या नेटवर्कचा अधिक विस्तृत उलगडा होण्याची शक्यता आहे, तसेच आरोपींविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल.