मुनघाटे महाविद्यालयाच्या तीन स्पर्धकांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

29 Dec 2025 18:17:16
कुरखेडा,
Mungate College दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोली द्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांचा आंतरविद्यापीठ बाल बॅडमिंटन स्पर्धेकरिता निवडक झालेली आहे .
 

Mungate College 
तामिळनाडू राज्यातील भारती दासन विद्यापीठातील तिरुचिरापल्ली येथे आयोजित ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी बाल बॅडमिंटन स्पर्धेकरिता निवडलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या मुलाच्या संघात श्री गोविंदराव मुनघाटे महाविद्यालयाच्ये टोकेश कोल्हे, असपाक शेख व अमन ठाकरे या विद्यार्थिची निवड करण्यात झालेली आहे. यापूर्वीही या महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी राज्य व देशातील विविध विद्यापीठात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करीत यश संपादन केलेले होते. मुनघाटे महाविद्यालयाचा शारीरिक शिक्षण विभाग हा अतिशय उपक्रमशील व कर्तबगार असून महाविद्यालयाचे 150 हून अधिक विद्यार्थी कलर होल्डर ठरलेली आहेत. या विद्यार्थ्यांना त्यामुळे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध झालेल्या असून विविध क्षेत्रात हे कलर होल्डर विद्यार्थी कार्यरत आहेत. यावर्षी सुद्धा ऑल इंडिया आंतर युनिव्हर्सिटीमध्ये बाल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, प्रभारी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. प्रमेश दाणी, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0