धक्कादायक! ६ दिवस कापसाच्या गंजीत होता मजुराचा मृतदेह

29 Dec 2025 14:35:34
कोरपना,
santosh maravi तालुक्यातील चनई खुर्द येथील विदर्भ जिनिंगमध्ये कापसाच्या गंजीत दबून एका मजुराचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना रविवार, 28 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. संतोष मरावी (28, रा. बाजक, जिल्हा दिंडोरी, मध्य प्रदेश) असे मृतक मजुराचे नाव आहे.
 

santosh maravi-death-cotton-ginning-chnai-khurd 
संतोष मरावी हा चनई खुर्द येथील विदर्भ जिनिंगमध्ये कामासाठी आला होता. गेल्या दोन महिन्यापासून जिनिंगमध्ये असेल्या खोलीत पत्नी व लहान मुला सोबत राहत होता. गेल्या तीन ते चार दिवसापासून तो बेपत्ता होता. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. त्यानंतर याबाबत त्याच्या पत्नीने चार दिवसा अगोदर कोरपना पोलिस ठाण्याला माहिती दिली होती. परंतु तो मिळाला नाही. याच दरम्यान रविवारी कापसाच्या जिनिंगमध्ये गंजी उतरवत असतान दुर्गंधी येऊ लागली. या बाबत कोरपना पोलिस ठाण्याला कळविण्यात आले. पोलिस उपनिरीक्षक देवानंद केकण, हवालदार प्रभाकर जाधव, किशोर रिंगोले यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह गंजीतून बाहेर काढला. घटनेचा पंचनामा करून मृतदेह कोरपना ग्रामीण रुग्णालयात आणला. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने संतोष मरावी याचा मृत्यू गंजीत दबून 6 ते 7 दिवसांपूवी झाला असवा, असे नागरिकांत बोलले जात आहे. उर्वरित तपासणीसाठी मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले.
 
 
या घटनेमुळे santosh maravi   जिनिंगमध्ये काम करणार्‍या कामगारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून, कामगारांच्या सुरक्षतेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. जिनिंगमध्ये दररोज किती मजूर कामावर आहे याची नोंद जिनिंग प्रशासणाकडे असणे अनिवार्य आहे. 6 ते 7 दिवसापासून जिनिंगमधील मजूर बेपत्ता असल्याने याबाबतची माहिती जिनिंग मालकाने पोलिस ठाण्याला देणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे या घटनेला जिनिंग प्रशासनाचा निष्काजीपणा कारणीभूत असल्याचे बोलल्या जात आहे. या घटनेची पोलिस विभागाने सखोल चौकशी करून संबंधितावर सदोष मनुष्य वधाचा गुन्ह दाखल करण्याची तसेच मृतकाच्या कुटुंबियांना जिनिंग मालकाकडून आर्थिक मदतीची मागणी होत आहे. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी मर्ग दाखल केला असून, पुढील तपास ठाणेदार वाढीवे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करित आहे. मृतकाच्या मागे पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
Powered By Sangraha 9.0