अनिल कांबळे
नागपूर,
MIDC police negligence इंस्टाग्रामवरुन प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाèया आराेपीविरुद्ध तक्रार देण्यासाठी पीडित तरुणीला भटकंती करावी लागली. एमआयडीसी पाेलिसांनी तक्रार न घेता तरुणीला परत पाठवले तर सायबर पाेलिसांनी प्रकरण आपसांत मिटविण्यासाठी दबाव टाकला, असा आराेप पीडित तरुणीने केला आहे. महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचा दावा करणाèया नागपूर पाेलिसांची प्रतिमा या प्रकरणामुळे मलिन झाली आहे. शेवटी पाेलिस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी यांनी पुढाकार घेतल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला.
बेसा परिसरात राहणाèया पीडित तरुणी संजना (काल्पनिक नाव) ही इंग्रजी विषयात एमए करीत असून तिची 2021 ला इंस्टाग्रामवरुन बालाघाटमधील टेकडी-खैरलांजी गावातील आराेपी शुभम घनश्याम गाऊपाले (25) याच्यासाेबत ओळख झाली. त्याने चॅटिंग करुन तिच्याशी मैत्री केली. काही दिवसांतच तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. संजना 17 वर्षांची असतानाच शुभम गाऊपाले याने नाेव्हेंबर 2022 मध्ये वानाडाेंगरी परीसरात नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संजनाचे अश्लील ाेटाे-व्हिडिओ काढले. त्यानंतर ताे वारंवार तिला शारीरिक संबंधाची मागणी करायला लागला. त्याला नकार दिल्यास ताे ाेटाे इंस्टाग्रावर टाकून बदनामी करण्याची धमकी देत हाेता. त्याच्या वारंवार धमकीला कंटाळून तिने पाेलिसात तक्रार देण्याची तयारी केली. त्यामुळे ती एमआयडीसी पाेलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली. एमआयडीसी पाेलिसांनी ‘घटनास्थळ आमच्या हद्दीत नाही’ असे उत्तर देऊन संजनाची तक्रार घेण्यास नकार दिला. त्यानंतर तिने सायबर पाेलिस स्टेशन गाठून तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायबर पाेलिसांनी चक्क प्रकरण आपसात घेण्याचा सल्ला देऊन तक्रार घेण्यास नकार दिल्याचा आराेप पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांसमाेर केला.
पाेलिस उपायुक्तांनी केली मदत
पीडित तरुणीची तक्रार नाेंदवून घेण्यास एमआयडीसी पाेलिस आणि सायबर पाेलिस टाळाटाळ करीत हाेते. यादरम्यान, पाेलिस उपायुक्त एस. ऋषिकेश रेड्डी यांनी तरुणीच्या तक्रारीची दखल घेतली. तिला एमआयडीसी पाेलिस ठाण्यात पाठवून तक्रार नाेंदवून गुन्हा दाखल केला, अशी माहिती पीडित तरुणीने दिली.