विदर्भस्तरीय कबड्डी सामन्यात जुवाडी संघ अव्वल

29 Dec 2025 18:28:20
समुद्रपूर,
Arvi kabaddi team तालुयातील वानरचुवा येथील आमदार समीर कुणावार, बळीराजा फाऊंडेशन आणि गावकर्‍यांच्या सहकार्याने छत्रपती क्रीडा मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच विदर्भस्तरीय दोन दिवसीय कबड्डी सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. आर्वी आणि जुवाडी संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत जुवाडी येथील संघ विजेता ठरला.
 

Vidarbha kabaddi tournament, Juwadi team winner, Arvi kabaddi team, 
स्पर्धेचे उद्घाटन सरपंच विलास नवघरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ठाणेदार विकास गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक गोमेद पाटील, तंटामुत समितीचे अध्यक्ष अनिल धोटे, पत्रकार गजानन गारघाटे, पोलिस पाटील सुनील डाडुरकर, सुरेश पुनवटकर, राहुल गाढवे, बहादुर सिंग अकाली, निलेश कापसे, संदीप दातारकर, रमेश चौके, किशोर तांदुळकर, आदींची उपस्थिती होती.
या स्पर्धेत २२ संघाने सहभाग घेऊन जंगलव्याप्त वानरचुवा गावातील मातीत खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. शेवटी आर्वी व जुवाडी संघात झालेल्या चुरशीच्या लढतीत जुवाडी संघाने विजय प्राप्त केला. जुवाडी येथील विजयी संघाला आमदार समीर कुणावार यांच्याकडून प्रथम पुरस्कार आकर्षक चषक देण्यात आला. बळीराजा फाऊंडेशन तर्फे आर्वी संघाला द्बितीय पुरस्कार व आकर्षक चषक देण्यात आले. तिसरा पुरस्कार वासी येथील संघाला शिवछत्रपती क्रीडा मंडळाकडून तर चौथा पुरस्कार उमेश चंदनखेडे आणि शंकर खंडरे यांच्याकडून ताबळपाणी संघाला देण्यात आला. उत्कृष्ट प्रदर्शन करणार्‍या संघाला चषक देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास नवघरे, प्रमुख पाहुणे म्हणून तंमुसचे अध्यक्ष अध्यक्ष धोटे, पोलिस पाटील सुनील डाडुरकर, निलेश कापसे, वनरक्षक रमेश चौके, निता डडमल, प्रकाश सहारे, अंबादास मुंडरे, सुरेश पुनवटकर आदींसह गावातील गणमान्य व्यती उपस्थित होते.स्पर्धेचे सूत्रसंचालन किशोर तांदूळकर आणि गुलाब मसराम यांनी केले. यशस्वीतेसाठी शिवछत्रपती क्रीडा मंडळाचे समीर पुनवटकर, सचिन बोटरे, शैलेश बोटरे, प्रफुल्ल बोटरे, राहुल बोटरे, राकेश वाघाडे, कुणाल मसराम, चेतन वाघाडे, अथरीक्ष बोटरे, अजय राऊत, निलेश कोहळे, अमोल नेहारे, रामू बोटरे, विशाल कोहळे, आदींनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0