सालोड, पिंपरी एन्ट्री अन् इव्हेंट परिसराचे सुशोभीकरण : वान्मथी सी.

29 Dec 2025 21:12:10
 प्रफुल्ल व्यास
 
वर्धा, 
 
wardha-vanmathic-collector राज्यात अनेक ठिकाणी जबाबदारी सांभाळली. परंतु, वर्धा जिल्हा सकारात्मक आहे. महात्मा गांधींच्या नावाने ओळख असलेला जिल्हा माझी कर्मभूमी ठरते आहे, हे भाग्यच म्हणावे लागेल. येथील जनता आणि जनतेतून येणारा लोकप्रतिनिधी चांगला आणि समजदार आहे. आपल्या एक वर्षाच्या कार्यकाळात अनेक चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर सकारात्मक आहेत. वर्धा शहरात येताना सालोड आणि पिपरी या दोन्ही एन्ट्री पाईंटचे सौंदर्यीकरण तसेच दत्तपूर परिसरातील घाणीचे साम्राज्य संपवण्यासाठी त्या भागाचे सौंदर्यीकरण करण्याचा आपला मानस असल्याची खास मुलाखत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी वर्धेत जिल्हाधिकारी म्हणून एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त तरुण भारत सोबत बोलताना दिली.
 
 

wardha-vanmathic-collector 
 
 
wardha-vanmathic-collector जिल्हाधिकारी वान्मथी सी. म्हणाल्या की, आपण २६ डिसेंबर २०२४ रोजी वर्धेत साईबाबा आणि प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद घेऊन जिल्हाधिकारी या पदाला न्याय देण्यासाठी काम सुरू केले. त्यावेळी भूसंपादनासह शतिपीठ आणि समृद्धी महामार्गाचा विषय महत्त्वाचा होता. त्यासोबतच आर्वी तालुयातील महत्त्वपूर्ण असलेला आर्वी उपसिंचन प्रकल्प पुर्ण करण्याचे काम हाती घेतले. कोरोना काळात हा प्रकल्प मागे पडला होता. ५ हजार ६०० लोकांना प्रत्यक्ष सिंचनाचा प्रत्यक्ष लाभ देणार्‍या या प्रकल्पाकडे आपण स्वत: लक्ष दिले. आज १ हजार हेटर शेतात सिंचनासाठी पाणी पोहोचते आहे. ६ महिन्यात हा प्रकल्प पुर्ण होऊन शेतकर्‍यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा व्हावा हेच ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. सुदैवाने जिल्हाधिकारी म्हणून आपण रूजू होणे आणि जिल्ह्याला पहिल्यांदा पालकमंत्री मिळणे हा सुंदर योगायोग झाला. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या कल्पनेतून जिल्ह्याचा विकास साध्य होतो आहे.
 
 
 
wardha-vanmathic-collector त्यांच्या अनेक कल्पनेतून शहर आणि जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. अंगणवाडी सध्या भाडेतत्त्वावर आहेत. त्या स्वत:च्या इमारतीत जाण्यासाठीचा आराखडा तयार होतो आहे. याशिवाय शासनाच्या अनेक इमारती बांधून पडून आहेत. परंतु, त्याचे नियोजन नाही. त्यासाठी महासंपत्ती या नावीन्यपूर्ण अभियानातून त्याकडे लक्ष देण्यात आले. त्यासाठी एक ओळखपत्र असेल. त्यामुळे नियंत्रणही ठेवणे सोपे होईल आणि ड्युप्लिकेशन होणार नाही. यासोबतच जिल्ह्यातील शेतकरी सुख व्हावा याचे प्रयत्न सुरू आहेत. शहरात घन कचरा व्यवस्थापन, औद्योगिकीकरण, स्क्रील डेव्हलपमेन्टसोबत जिल्ह्याचा जीडिपी वाढवणावर आमचा भर आहे. यशवंतराव चव्हाण मुत विद्यापिठाकरिता जागा मिळाली, आता टाटा कन्सल्टन्सी मार्फत विकास तसेच इंजिनिअरिंग किंवा पॉलिटेनिककरिताही आम्ही प्रयत्नरत आहोत. शेतकर्‍यांना पाणी मिळाल्यास त्यांचे उत्पादन वाढेल.
 
 
 
wardha-vanmathic-collector येथेच प्रोसेसिंग व पुढे लस्टर असे नियोजन आहे. परंतु, येथे पाठपुरावा करण्यासाठी नागरिक कमी पडतात अशी खंत व्यत करून गांधीजींच्या संकल्पनेतील गांधी जिल्हा स्वच्छ व्हावा. नागरिकांनी स्वच्छतेकरिता प्रशासनाला सहकार्य करावे. शहर स्वच्छ ठेवणे कठीण नाही. शासन, प्रशासन आणि नागरिक मिळून शहराचा विकास साध्य होईल, असे त्यांनी तरुण भारत सोबत बोलताना सांगितले. वर्धा शहरात गोटमार्केट आणि हॅप स्टीट यावर आम्ही काम करतो आहे. ते लवकरच प्रत्यक्षात उतरेल असा विश्वास असल्याचे जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी सांगितले. यासोबतच सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून शहराचे सौंदर्यीकरण होणार आहे. यात गोलबाजारातील टिळकांचा पुतळा हा विषय महत्त्वाने हाताळल्या जाईल, असे त्यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0