वय वाढल्यानंतर त्वचेला कायमच तरुण ठेवण्यासाठी 'आहार आणि काळजी'

03 Dec 2025 12:22:02
मुंबई,
Anti-Aging Diet वयाच्या चाळिशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल दिसून येतात. मासिक पाळीच्या समस्यांपासून ते त्वचेवर येणाऱ्या सुरकुत्या, बारीक रेषा, वांग, हाडांमध्ये वेदना, अचानक शरीरात वाढलेले दुखणे यांसारख्या समस्या मानसिक तणावही निर्माण करतात. मात्र, शरीरातील या बदलांकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य काळजी घेतल्यास महिला कायमच तरुण आणि तंदुरुस्त राहू शकतात.
 

Anti-Aging Diet 
अनेक महिलांमध्येAnti-Aging Diet  त्वचेवरील सुरकुत्या आणि बारीक रेषा कमी करण्यासाठी विविध उपाय केला जातो. फेसवॉशपासून महागड्या स्किन केअर प्रॉडक्ट्सपर्यंत अनेक प्रकार वापरले जातात, पण चुकीच्या प्रॉडक्ट्सच्या सतत वापरामुळे त्वचा निस्तेज होऊ शकते. तज्ञांचा सल्ला असा आहे की, त्वचेला वरून पोषण देण्यासोबतच आतून पोषण देणेही तितकेच महत्त्वाचे आहे.त्वचा कायम तरुण ठेवण्यासाठी शरीरात कोलेजन, विटामिन सी आणि इतर आवश्यक घटकांची योग्य पातळी असणे गरजेचे आहे. कोलेजन त्वचेला हायड्रेट ठेवते, ओलावा टिकवते आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. फ्री रॅडिकल्समुळे होणारे त्वचेचे नुकसान टाळण्यासाठी कोलेजनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
 
 
संत्री, टोमॅटो, पेरू, ढोबळी मिरची, आंबट फळे आणि सुका मेवा यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे शरीरात कोलेजनची निर्मिती वाढते. Anti-Aging Diet  तसेच, त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून २-३ लिटर पाणी प्यावे. पाण्यासोबत फळांचा रस, डिटॉक्स ड्रिंक यांचा समावेश केल्यास त्वचेवर चमक कायम राहते. तेलकट व तिखट पदार्थांचे सेवन मर्यादित करणे आवश्यक आहे, कारण या पदार्थांमुळे त्वचा कोरडी होऊ शकते.बेरीज, पालक, दाळिंब, द्राक्षे, बदाम, सूर्यफूलाच्या बिया, पालक आणि एवोकॅडो यांसारख्या अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त पदार्थांमुळे त्वचेला पोषण मिळते आणि ग्लो टिकतो. झिंक व सेलेनियमयुक्त पदार्थ जसे की डाळी, चणे, शेंगा, ब्राऊन राईस त्वचेमध्ये कोलेजन निर्माण करण्यात मदत करतात. टोफू, पालक, तुळस यामध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड्स असल्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि सूज कमी होते.थंडीच्या दिवसांमध्ये त्वचा कोरडी होऊ नये यासाठी हा आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. योग्य आहारासोबत नियमित मॉइश्चरायझिंग आणि पुरेशी विश्रांती घेतल्यास महिला वयाच्या कोणत्याही टप्प्यावर तरुण दिसू शकतात आणि त्वचेवरचे एजिंगचे परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येतात.
Powered By Sangraha 9.0