आर्वीत वन कर्मचार्‍याच्या आत्महत्येने खळबळ

03 Dec 2025 20:19:57
आर्वी,
forest-employee-commits-suicide : येथील वनकर्मचारी घनश्याम धामंदे (४८) रा. कन्नमवारनगर यांनी विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार २ रोजी सकाळी फिरायला जाणार्‍या नागरिकांना तळेगाव मार्गावरील न्यायालयाच्या नवीन इमारतीसमोर वन कर्मचारी मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. कारंजा येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्रात त्यांची बदली झाली होती. सोमवारी रात्रीला ड्युटीवर जात असल्याचेे सांगून ते घरून बाहेर पडले. मंगळवारी सकाळी न्यायालयाच्या नवीन इमारतीसमोर त्यांचा मृतदेह आढळून आला. नागरिकांनी पोलिसांना माहिती देताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळी दारूच्या बाटलीसह विषारी औषधीचीही बाटली आढळून आली. या घटनेची आर्वी पोलिसांनी नोंद घेतली.
 
 

संग्रहित फोटो 
Powered By Sangraha 9.0