दुःखद घटना! दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा जागीच मृत्यू

03 Dec 2025 15:19:43
पुणे,
Baramati road accident बारामती शहरातील जगताप कुटुंबीय तिरुपती बालाजी मंदिरात देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना पहाटे साडेचार वाजता हुबळी राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या चारचाकीला ट्रकने धडक दिल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात अनिल जगताप जागीच मृत पावले, तर त्यांची पत्नी वैशाली जगताप गंभीर जखमी झाली आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघातात त्यांची एक मुलगी जखमी झाली असून तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 

Baramati road accident  
जगताप कुटुंब बारामतीतील Baramati road accident शिवाजी नगर येथील असून ते शनिवारी तिरुपती दर्शनासाठी निघाले होते. अपघाताच्या वेळी गाडीत एकूण पाच जण होते, त्यातील दोन जण मृत्युमुखी पडले, एक मुलगी जखमी झाली आणि उर्वरित दोन जण सुखरूप आहेत. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रस्ते महामार्गावरील अपघाताची वारंवार घडणारी घटना चिंताजनक ठरत असून, वाहनांचा वेग, ओव्हरटेक करताना घाई आणि ड्रँक अँड ड्राईव्ह या घटकांमुळे अपघात होण्याचे मुख्य कारण मानले जाते, असे स्थानिक प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
Powered By Sangraha 9.0