तभा वृत्तसेवा
पुसद,
Cold wave health impact दोन-तीन दिवसांपासून पुन्हा नागरिकांना बोचèया थंडीचा सामना करावा लागतो आहे. यामुळे त्वचारोगासह दम्याचे रुग्ण वाढले आहेत. हवेचा वेग कमी-अधिक होत असल्याने जाणवणाèया गारठ्यामुळे घशाचे संसर्गजन्य आजार, सर्दी, खोकल्याच्या रुग्णांत वाढ झाली आहे.
नोव्हेंबरअखेर Cold wave health impact हिवाळ्याचा जोर वाढत आहे. आठ दिवसांपूर्वी वातावरणातील थंडी गायब झाली होती. यामुळे स्वेटरसह कानटोपी घालण्याचे प्रमाण कमी झाले होते. दोन दिवसांपासून पुन्हा हवेतील गारठा वाढला असून, बोचरी थंडी जाणवत आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीलाच थंडीचे प्रमाण अधिक जाणवत असल्याने आगामी दोन महिन्यांत थंडीचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. थंडीच्या कडाक्यामुळे सांधेदुखीसह दम्याचे आजार वाढत आहे.अचानक थंडीची लाट ओढवल्याने वातावरणात बदल झाला असून, रात्रीसह दिवसाचेही तापमान कमी झाले आहे. आगामी काळात थंडी वाढल्यास विविध साथीच्या आजारासह त्वचारोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ऋतू बदल होत असल्याने वातावरणात बदल झाला असून, लहान मुलांमध्ये सर्दी, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच वयोवृद्ध नागरिकांत गुडघेदुखीसह दम्याचे प्रमाण अधिक असल्याने अनेकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागत आहे.