पुणे,
Criticism hits Prajakta Gaikwad मराठी मनोरंजनविश्वात सध्या लग्नघाई सुरु आहे. “स्वराज्यरक्षक संभाजी” मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने उद्योगपती शंभूराज खुटवडसोबत आपली लग्नगाठ बांधली. प्राजक्ताच्या लग्नानंतर सोशल मीडियावर तिच्या आणि शंभूराजच्या लगीनसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले. खासकरून रिसेप्शनमधील ग्रँड एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे.
पुण्यात पार पडलेल्या पारंपरिक आणि शाही रिसेप्शनसोहळ्यात प्राजक्ता आणि शंभूराजने भव्य नंदीवर बसून एन्ट्री घेतली. या एन्ट्रीमध्ये फटाके फोडण्यात आले आणि थाटामाटात कार्यक्रम सुरू होता. पण, या ग्रँड एन्ट्रीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेकांनी कौतुक केले, तर काहींनी टीका केली. विशेषत: प्राजक्ता आणि शंभूराज बसलेल्या नंदीच्या पुढे भगवान शंकर चालत असल्याचे पाहून काही चाहत्यांना नाराजी वाटली.
सोशल मीडियावर अनेक युजर्सनी कमेंट्सद्वारे आपला राग व्यक्त केला. एका युजरनं लिहिलं, “हे फार चुकीचं आहे, आपल्याच देवांची मस्करी आहे, तर दुसऱ्याने म्हटलं, “हल्ली प्रत्येक गोष्टीचा शो-ऑफ करावा लागतो, लग्न हे स्वतःसाठी करतात की समाजासाठी हेच समजत नाही. काहींनी कलाकारांच्या हिट मालिका झाल्यामुळे त्यांना आत्मविश्वास आला आहे, असा टोला लगावला.