भरधाव ट्रकच्या धडकेत भाऊ-बहिण ठार; एक गंभीर जखमी

03 Dec 2025 15:55:16
अनिल कांबळे

नागपूर,
Nagpur accident शहरातील आरबीआय चौक परिसरात मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण अपघातात अल्पवयीन भाऊ-बहिणीचा दुर्दैवी अंत झाला असून, एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. भरधाव आलेल्या ट्रकने मोटारसायकलला मागून धडक दिल्याने हा अपघात घडला. रुद्र सुनील सिंगलधुपे (११) त्याची बहिण सिमरन सुनील सिंगलधुपे (१२) अशी अपघातातील मृतांची तर शेषनाथसिंग जागेश्वरसिंग (५६, सर्व रा. प्लॉट नंबर १११, केजिएन सोसायटी, काटोल रोड, गिट्टीखदान) असे जमखीचे नाव आहे.
 
 
Nagpur accident
प्राप्त माहितीनुसार,Nagpur accident  मंगळवारी रात्री शेषनाथसिंग हे रुद्र आणि सिमरन यांच्यासोबत (एमएच ३१ एफके १८११) ने जात होते. यावेळी, ट्रक (एनएल ०१ एजी ०८६८) क्रमांकाचा ट्रक चालक सहेंदर पंचम बिन (३७, जंगलमहाल, मिझार्पूर, उत्तरप्रदेश) याने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत मागून दुचाकीला जोरदार धडक दिली आणि पळून गेला. या अपघातात दुचाकीवरील रुद्र सिंगलधुपे याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याची बहीण सिमरन सिंगलधुपे आणि शेषनाथसिंग जागेश्वरसिंग हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने मेयो रुग्णालयात नेण्यात आले असता, उपचारादरम्यान डॉक्टरांनी सिमरन सिंगलधुपे हिला मृत घोषित केले. गंभीर जखमी शेषनाथसिंग यांचा उपचार सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 

आरोपीला चालकाला अटक
 
 
अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला होता, मात्र सदर पोलिसांनी तातडीने शोध घेत त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी सदर ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या तक्रारीवरून, ट्रक चालक आरोपी सहेंदर पंचम बिन याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.
Powered By Sangraha 9.0