विधानसभेत नीतीश सभागृहचे नेता घोषित; तेजस्वी यादव विरोधी पक्षनेतेपदी नियुक्त

03 Dec 2025 12:56:49
पाटणा, 
nitish-declared-leader नितीश कुमार यांना बिहार विधानसभेत सभागृह नेते म्हणून घोषित करण्यात आले आहे, तर तेजस्वी यादव यांना विरोधी पक्षनेते म्हणून घोषित करण्यात आले आहे. तथापि, तेजस्वी यादव आज सभागृहात उपस्थित नव्हते. ते मंगळवारी दिल्लीला रवाना झाले होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती देखील चर्चेचा विषय होती.
 
 
tejashwi-yadav
 
बिहारमधील १८ व्या विधानसभेचे पहिले अधिवेशन नुकतेच सुरू झाले. यावेळी सर्व आमदारांनी शपथ घेतली आणि विधानसभेचे अध्यक्ष देखील निवडण्यात आले. मंगळवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रेम कुमार यांची विधानसभेचे अध्यक्ष म्हणून एकमताने निवड करण्यात आली. तेजस्वी यादव यांनीही या प्रसंगी निवेदन केले. nitish-declared-leader विधानसभेचे नवे अध्यक्ष प्रेम कुमार सभागृहात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष दोघांनाही समान संधी देतील अशी आशा तेजस्वी यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0