अमरावतीत सर्वच पक्ष स्वबळावर

30 Dec 2025 21:42:02
अमरावती, 
amravati-news : महापालिका निवडणुकीसाठी नामांकन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करून स्वबळावर निवडणूक लढण्याची हुंकार भरली आहे. महायुती तुटली तर महाआघडी पण पूर्णपणे अस्तित्वात आली नाही. उमेदवारांची पळवापळवी झाली. आता कोणाचे किती उमेदवार विजयी होतात, त्यानंतरच प्रत्येकाच्या ताकदीचा अंदाज येणार आहे. भाजपाने ७५ जागा जाहीर केल्या, त्यातल्या ६ जागा युवास्वाभिमानला दिल्याने भाजपाने सध्या ६९ जागेवर उमेदवार दिले असून त्यांची नावे जाहीर केली आहे.
 
 
amt
 
यात २८ नगरसेवकांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली आहे. १२ जागा मुस्लिमबहुल असल्याने भाजापाने गेल्या निवडणुकी प्रमाणे तेथे उमेदवार दिलेले नाही. काँग्रेसने ७४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दोन चार वगळता सर्व नगरसेवकांना त्यांनी पुन्हा उमेदवारी दिली आहे. १३ जागा आम्ही मित्रपक्षांना दिल्याचे त्यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने ८२ उमेदवार घोषीत केले आहे. त्यांनी जुन्या व नव्या उमेदवाराचा समन्वय साधला आहे. शिवसेना शिंदे गटाने ६९ उमेदवार जाहीर केले आहे. त्यात काही स्वपक्षाचे तर काही अन्य पक्षातून आलेल्या इच्छुकांचा समावेश आहे. युवा स्वाभिमान पक्षाने भाजपासोबत युतीत असताना ४१ उमेदवार जाहीर केले आहे.
 
 
त्यांनी आपल्या तीन नगरसेवकांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काही बाहेरून आलेले तर काही स्वपक्षाचे उमेदवार त्यांनी अन्य छोट्या पक्षानी सुद्धा आपले उमेदवार मैदानात उतरविले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रमुख सर्व पक्ष एकमेकांच्या हालचालीवर लक्ष ठेऊन होते. ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाल्या नाही त्यातील काहींनी अन्य पक्षांकडे धाव घेतली. जे आपल्या पक्षाप्रती निष्ठावान होते, त्यांनी शांत राहणे पसंत केले. भाजपातल्या काही इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्याने शिंदेसेनेची व राष्ट्रवादी अजित पवारची उमेदवारी घेऊन बंडाचे निशाण फडकले आहे. काँग्रसमध्ये पण बंडखोरी झाली आहे. काहींनी भाजपाकडे तर काही अन्य पक्षाकडे गेले आहे. अर्ज छाननी व मागे घेण्याच्या तारखेपर्यंत काही किरकोळ बदल होण्याची शक्यता आहे.
 
 
नाराजी नाट्य
 
 
उमेदवारी न मिळाल्याने प्रमुख पक्षात नाराजी नाट्य पाहायला मिळाले. सर्वाधिक भाजपात नाराजी दिसली. शब्द देऊनही उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. दोनचार जणांना तर अश्रु अनावर झाले. काँग्रेसमध्ये नाराजी दिसली. एकाने तर उमदेवारी न दिल्यामुळे बॅनर लावून काँग्रेस नेत्याचे आभार मानले. याशिवाय अन्य पक्षात नाराजीची तीव्रता फार नव्हती. किरकोळ प्रमाणात राजी-नाराजी दिसली.
Powered By Sangraha 9.0