अकोला,
BJP and NCP join hands in Akola. आठवड्यापासून युती होण्याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना सोमवारी रात्री या चर्चेला मूर्त रूप आले.अकोल्यात भाजप व राष्ट्रवादी एकत्र लढणार असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १४ जागा आल्या आहेत तर ६६ जागांवर भाजपने देखील लढण्याची तयारी केली आहे. याशिवाय शिवसेनेसोबत चाललेल्या चर्चेतून शेवटपर्यंत तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे. मनपा निवडणुकीत उमेदवारी अर्जाचे काही तास शिल्लक असताना देखील अकोल्यात जागा वाटपावरून युती व आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.दरम्यान सोमवारी रात्री उशिरा शहरातील एका हॉटेलमध्ये भाजप पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक झाली.
या बैठकीत खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, विजय अग्रवाल, राष्ट्रवादी पक्षाचे निवडणूक निरीक्षक राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार अमोल मिटकरी, महानगराध्य विजय देशमुख, प्रदेश पदाधिकारी मदन भरगड उपस्थित होते. रात्री उशिरा झालेल्या या चर्चेमधून युतीवर शिक्कामोर्तब झाले आहे.यामध्ये राष्ट्रवादी १४ जागा देण्यात आल्या.तर भाजप ने ६६ जागांवर लढण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे सोमवारीच शिवसेनेसोबत झालेल्या बैठकीत माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया जिल्हा प्रमुख श्रीरंग पिंजरकर यांच्या सोबत भाजप पदाधिकाऱ्यांच्या झालेल्या दोन ते तीन बैठकीत युतीबाबत तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने या युतीच्या चर्चा मावळल्या आहेत.
उबाठाला प्रहारची साथ;मशाल चिन्हावर लढणार
मनपा निवडणुकीत आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार व उबाठा गटाची युती होईल अशी चर्चा होती.मात्र वाटाघाटीवरून नेत्यांमध्ये मतभेद झाले.त्यामुळे उबाठा गटाने प्रहराच्या साथीने स्वतंत्र लढण्याची तयारी केली असून .प्रहार पक्ष चार जागांवर मशाल चिन्ह घेवून लढणार आहे, तर उबाठा गट किती जगावर लढणार याबाबत अद्याप आकडा समोर आला नाही.तर काँग्रेस ने ५५ जागावर लढण्याची तयारी केली असून उर्वरित जागा राष्ट्रवादी शरद पवार गट लढण्याची माहिती आहे. तर वंचित आघाडीचा फार्म्युला देखील अद्याप पर्यंत पाकीट बंद असून त्यांची ही यादी आज जाहीर होणार आहे.