चंद्रपूर,
bjp-ticket-distribution : भारतीय जनता पार्टीतही येत्या महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट वाटपात मोठी नाराजी दिसली. अनेकांना आशेवर ठेवून अखेरच्या क्षणी त्यांची उमदेवारी कापण्यात आल्याने ईच्छूकांनी रोष व्यक्त केला. राजेंद्र गांधी, राजेंद्र अडपेवार, विशाल निंबाळकर, शीला चव्हाण, सुनील डोंगरे आदींना भाजपाची अधिकृत उमदेवारी मिळाली नाही. काही नाराज उमेदवारांनी ज्या हॉटेलात तिकीट वाटप करण्यात येत होते, तेथे गोंधळ घातला.

भाजपाच्या अधिकृत यादीत, तुकूम प्रभागातून सरला कुळसंगे (अनु. जमाती महिला), अनिल फुलझेले (नामाप्र), आशा बेले (सर्वसाधारण महिला), सुभाष कासनगोट्टूवार (सर्वसाधारण) यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर शास्त्रीनगरमधून शीतल गुरनुले (अनु. जाती), अनुजा तायडे (सर्वसाधारण महिला), विठ्ठल डुकरे (सर्वसाधारण) यांना उमेदवारी मिळाली आहे. एमईएल प्रभागातून नीलेश गवळी (अनु. जाती), जितेश कुळमेथे (अनु. जमाती), आशा देशमुख (नामाप्र महिला), सविता सरकार (सर्वसाधारण महिला) यांना उमेदवारी देण्यात आली. बंगाली कॅम्पमधून जयश्री जुमडे (अनु. जाती महिला), आकाश मस्के (नामाप्र), सारिका संदूरकर (सर्वसाधारण महिला), रॉबीन विश्वास (सर्वसाधारण) या उमदेवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
विवेक नगरमधून पुष्पा उराडे (अनु. जाती), अंजली घोटेकर (नामाप्र महिला), संदीप आवारी (सर्वसाधारण) यांनाही भाजपाची उमेदवार देण्यात आली असून, इंडस्ट्रीयल इस्टेटमधून राजलक्ष्मी कारंगल (अनु. जाती महिला), सुनीता जैसवाल (नामाप्र महिला), महेश झिटे (सर्वसाधारण), चंद्रशेखर शेट्टी (सर्वसाधारण) यांची नावे अधिकृत उमदेवारांच्या यादीत आहे. जटपुरा वॉर्डातून प्रमोद क्षिरसागर (नामाप्र), छबू वैरागडे (सर्वसाधारण महिला) यांना उमेदवारी मिळाली. वडगावमधून सोनल देवतळे (नामाप्र महिला), रवी जोगी (नामाप्र), राखी कंचर्लावार (सर्वसाधारण महिला), देवानंद वाढई (सर्वसाधारण) यांना उमेदवारी दिली गेली आहे. नगिनाबागमधून सविता कांबळे (अनु. जाती महिला), प्रशांत चौधरी (नामाप्र), शीतल आदे (सर्वसाधारण महिला), राहुल पावडे (सर्वसाधारण) यांना उमेदवारी मिळाली. एकोरी वॉर्डातून राजू येले (अनु. जाती), सरिता घटे (नामाप्र महिला) यांना उमेदवारी दिली. भानापेठ वॉर्डातून सूरज पेदुलवार (नामाप्र), आशा अबोजवार (सर्वसाधारण महिला), संजय कंचर्लावार (सर्वसाधारण) यांना उमेदवारी घोषित झाली.
महाकाली वॉर्डातून पुष्पा दहेगावकर (अनु. जाती महिला), अविता लडके (नामाप्र महिला), प्रज्वल कडू (सर्वसाधारण), राजेंद्र शास्त्रकार (सर्वसाधारण) यांना उमेदवारी मिळाली. बाबुपेठमधून रमेश दुर्योधन (अनु. जाती), अश्विनी पिंपळशेंडे (नामाप्र महिला), श्रृती ठाकूर (सर्वसाधारण महिला), प्रदीप किरमे (सर्वसाधारण) यांना उमेदवारी जाहीर झाली. भिवापूरमधून ज्योती जीवने (अनु. जाती महिला), अमोल शेंडे (नामाप्र), वनिता आंबेकर (सर्वसाधारण महिला), संतोष जिलेवार (सर्वसाधारण) यांना उमेदवारी दिली गेली. विठ्ठल मंदिर वॉर्डातून संगीता खांडेकर (नामाप्र महिला), विनोद शेरकी (नामाप्र), भालचंद्र दानव (सर्वसाधारण) यांना उमेदवारी प्राप्त झाली. लालपेठ कॉलरी येथून कविता कनकम (अनु. जाती महिला), ज्योती गेडाम (अनुु. जमाती महिला), कल्पना बगुलकर (सर्वसाधारण) यांना उमेदवार करण्यात आले. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातून रमेश पुलीपाका (अनु. जाती), राजू तोडसे (अनु. जमाती) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेनेला सोडल्या नऊ जागा
भाजपाने शिवसेनेशी युती केली असून, त्यांना नऊ जागा सोडल्या आहे. शिवसेनेच्या शास्त्रीनगर येथून पूजा केळझरकर (नामाप्र महिला) यांना, विवेक नगरमधून प्रियंका गुप्ता (सर्वसाधारण महिला) यांना, जटपुरा वॉर्डातून भाग्यश्री हांडे (अनु. जाती महिला), रवी आसवाणी (सर्वसाधारण) यांना, एकोरी वॉर्डातून इसमत रशीद हुसेन (सर्वसाधारण महिला), शेख नासिर शेख अहमद (सर्वसाधारण) यांना, भानापेठ वॉर्डातून माला पेंदाम (अनु. जमाती महिला) यांना, तर विठ्ठल मंदिर वॉर्डातून सीमा रामेडवार (सर्वसाधारण महिला) आणि बाबासाहेब आंबेडकर वॉर्डातून प्रतिमा ठाकूर (सर्वसाधारण महिला) यांना उमेदवारी मिळाली आहे.