तभा वृत्तसेवा
दारव्हा,
rationed-food-grains : स्वस्त धान्य दुकानांमार्फत विविध योजनांच्या लाभार्थ्यांना दिल्या जाणाèया रेशनच्या धान्य वितरणात 2026 या नवीन वर्षात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी सुधारीत परिमाण लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार तांदूळाऐवजी गहू वितरणात वाढ होणार आहे. आता लाभार्थ्यांना साखरसुद्धा मिळणार आहे.
पुरवठा विभागाकडून 1 जानेवारी 2026 पासून धान्य वाटपासंदर्भात सुधारित परिमाण करण्यात आले. पूर्वी प्राधान्य योजनेच्या लाभार्थ्यांना तांदूळ 3 किलो, गहू 2 किलो असे एकूण 5 किलो आणि अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना तांदूळ 20 किलो आणि गहू 15 किलो असे एकूण 35 किलो धान्य दिल्या जात होते.
आता एकूण धान्य तेवढेच मिळेल. परंतु यात काही बदल करण्यात आले. त्यानुसार प्राधान्य योजनेच्या लाभार्थ्यांना तांदूळ 2 किलो, गहू 3 किलो आणि अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना तांदूळ 14 किलो तर गहू 21 किलो मिळेल. 1 किलो साखर प्रती अन्त्योदय कार्ड शुल्क 20 रुपये तालुक्यात प्राधान्य योजनेचे 36578 रेशन कार्ड व 134070 लाभार्थी तर अंत्योदय योजनेचे 8115 कार्ड व 28899 लाभार्थी असून या सर्वांना लाभ देण्यात येणार असल्याचे पुरवठा निरीक्षक तुषार राठोड यांनी सांगितले.