माता मंदिरात सापडला नवजात शिशुचा मृतदेह!

30 Dec 2025 09:48:05
गर्रा/बघेडा,
child was found in the temple. लेकरांना आपण जीवपेक्षाही जास्त जपतो. मात्र माणुसकीला लाजवेल आणि निष्ठूरपणाचा कळस गाठणाऱ्या एका घटनेने तुमसर तालुक्यातील राजापूर गावात खळबळ माजली आहे. एका नवजात शिशुचा चिमुकल्याचा मृतदेह गावातील देवीच्या मंदिरात आज 30 रोजी आढळून आला आहे. दरम्यान पोलिसांनी येऊन तपास सुरु केला आहे. तालुक्यातील गोबरवाही पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या राजापूर येथे उघडकीस आलेल्या या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. राजापूर नाकाडोंगरी मार्गावर एक शिव मंदिर आहे. याच परिसरात देवीचे माता मंदिर आहे.
 
 

bnadara 
 
आज सकाळी मंदिर समितीचे सदस्य लक्ष्मीकांत गोपाले हे नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता मंदिराची स्वच्छता करण्यासाठी गेले असता, त्यांना गेले असता त्यांना माता मंदिरात कापडात गुंडाळून ठेवलेल्या अवस्थेत चिमुकला आढळला. चिमुकला मृत असल्याचे लक्षात येताच याची माहिती त्यांनी पोलीस पाटील दिवाकर डोंगरे यांना दिली. दरम्यान पोलिसांनी येऊन मृतदेह ताब्यात घेतला आहे. हा नवजात शिशु आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून नेमका हा प्रकार नरबळीचा की आणखी कशाचा अशी चर्चा सुरु झाली आहे. नवजात शिशुचा जीव घेणाऱ्या निष्ठूरांप्रती प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पोलिसाच्या तपासात काय निष्पन्न होते, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून असेल.
 
Powered By Sangraha 9.0