धरण उश्याशी, कोरड घशाशी; १४ वर्षांपासून जलकुंभ वनवासात!

30 Dec 2025 20:16:07
विजय माहूरे
सेलू, 
water-reservoir-bori-kokate : गावाला शुद्ध पाणीपुरवठा व्हावा व नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून शासनाने प्रत्येक गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळ योजना कार्यान्वित केल्या. मात्र, १४ वर्षांचा दीर्घ काळ लोटूनही पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणार्‍या बोरी येथील जलकुंभाला वनवास सोसावा लागत आहे.
 

jlk 
 
तालुयातील पर्यटनस्थळाच्या कुशीत वसलेले बोरी (कोकाटे) हे गाव गेल्या १४ वर्षांपासून शुद्ध पाण्यापासून वंचित आहे. येथे शुद्ध पाण्याचे स्त्रोत तयार होण्याकरिता जल जीवन अंतर्गत सन २०१० ते २०११ या काळातील सरपंच अमर कोकाटे यांनी जल जीवन योजनेंतर्गत बसस्थानक परिसरात मोठी पाण्याची टाकी व या लगतच नवीन परिसरात विहीर खोदकाम करण्यात आले ह़ोते. टाकीचे बांधकाम होत असताना गावामध्ये अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आता लवकरच शुद्ध पिण्याचे पाणी घरीच मिळणार, अशी अपेक्षा नागरिकांना होती. पण, त्यांचा आनंद हा जास्त काळ टिकून राहिला नाही. तत्कालीन सरपंचाचा कार्यकाळ काही दिवसातच संपला आणि टाकीचे काम अपूर्णच राहिले. त्यानंतर दुसर्‍या कार्यकाळात रोशन मस्के हे सरपंचपदी आरुढ झाले. ज्यांना नळ योजनेचा लाभ हवा आहे त्यांनी अर्ज करून व अनामत रकम भरून लवकरात लवकर नळ योजनेचा लाभ घ्यावा, अशी विनंती सरपंच मस्के यांनी केली.
 
 
यावर ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात पैसे सुद्धा भरले असतानासुद्धा नळ घरापर्यंत पोहोचलेच नाही. तोपर्यंत मस्के यांचा सुद्धा कार्यकाळ लोटून गेला. त्यानंतर लगेच निवडणुका झाल्या आणि विशाल भांगे सरपंच झाले. त्यांनी निर्णय घेत पिण्याच्या पाण्याची ठेकेदाराकडून आपल्या ग्रामपंचायतकडे हस्तांतरित करून पाणी वाटप करण्याकरिता नवीन कर्मचार्‍यांची निवड सुद्धा केली. परंतु, टाकीत पाणी पोहोचलेच नाही. काही महिने लोटल्यावर गावातील जलवाहिनी फुटणे सुरू झाले. परिस्थिती लक्षात घेता त्यांनी प्रयत्न करून ३९ लाख रुपयांचा निधी जल जीवन योजनेंतर्गत खेचून आणला व नवीन जलकुंभ परिसरात उभारून तेथील नागरिकांना पाण्याची व्यवस्था करून दिली. परंतु, जुन्या टाकीलगत असलेल्या नागरिकांना आजपर्यंत पाणी मिळालेच नाही. येथील ३० ते ४० घरांकरिता वेगळी पाण्याची टाकी करण्यात आली. परंतु, गावातील व शांतीनगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून या टाकीतून पाणीच आले नसल्याची खंत ग्रामस्थ शेखर बुधबावरे यांनी व्यत केली.
 
 
पायउतार केल्याने दुर्लक्ष : भांगे
 
 
आपल्या कार्यकाळात जल जीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरात नळ योजनेतून सर्व नागरिकांना मोफत नळाचे कनेशन देण्यात आले. काम सुरू असताना आपल्याला पायउतार करण्यात आले. त्यामुळे या कामाकडे आपले दुर्लक्ष झाल्याची
Powered By Sangraha 9.0