मुंबई,
dhurandhar-on-ott आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस लवकर येणार आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या मुख्य भूमिकांमुळे चित्रपट प्रदर्शित होताच चर्चा पसरली होती. सिनेमाचे कथानक आणि अभिनय प्रेक्षकांना भावला असून, बॉक्स ऑफिसवरही अनेक रेकॉर्ड मोडले गेले आहेत. 'धुरंधर पार्ट 2'बाबतही प्रेक्षक आतापासूनच उत्सुक आहेत.

'धुरंधर'च्या ओटीटी रीलिजबाबत माहिती समोर आली आहे. सध्या शक्यता आहे की हा सिनेमा 30 जानेवारी 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. मात्र, अद्याप सिनेमाचे निर्माते किंवा कलाकारांनी अधिकृतपणे ओटीटी रिलीजबाबत घोषणा केलेली नाही, तसेच नेटफ्लिक्सकडूनही कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. चित्रपटात रणवीर सिंग आणि अक्षय खन्नासह आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, राकेश बेदी, सारा अर्जुन, गौरव गेरा, दानिश पांडोर अशा दिग्गज कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. dhurandhar-on-ott थिएटरमध्ये हा चित्रपट पहिल्या दिवसापासूनच हिट ठरला आणि प्रेक्षक आता तो आरामात घरबसल्या ओटीटीवर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. ज्यांना थिएटरमध्ये संधी मिळाली नाही, तेही या ओटीटी रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. dhurandhar-on-ott 24 व्या दिवसापर्यंत सिनेमाने 690.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे, ज्यामध्ये 24 व्या दिवशी 22.5 कोटी रुपये मिळाले. 25 व्या दिवशीही चित्रपटाने मोठ्या प्रमाणात कमाई केली. 2025 वर्षात हा चित्रपट सर्वाधिक कमाई करणारा ठरला असून, अद्याप थिएटरमध्ये पाहू न शकलेल्या प्रेक्षकांसाठी ओटीटीवर हा चित्रपट पहाण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.