'या पुन्हा दीप उजळूया' या पुस्तकाचे प्रकाशन

30 Dec 2025 19:01:46
नागपूर,
book-publication : भारतीय सेवा मंडळ या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने नरेंद्रनगर येथील संस्थेच्या कार्यालयात डॉ. हरिदास आखरे लिखित भारतरत्न स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मेरी कविता या ग्रंथाचा भावानुवाद असलेल्या ’ या पुन्हा दीप उजळूया ’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
 
 
ngp
 
 
 
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब झोडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख अतिथी म्हणून महानगरपालिकेचे माजी सभापती रमेश शिंगारे, नगरसेविका विशाखा मोहोड, प्रमोद पांडे, राम आखरे उपस्थित होते. कोणतेही शासकीय अनुदान न स्वीकारता गेल्या वर्षांपासून भारतीय सेवा मंडळ,ही संस्था शेतकरी, वंचित-उपेक्षित घटकांचे प्रश्न, गरीब व गरजू नागरिकांना सातत्याने मदत व सहकार्य देत आहे. लोकशाही, माहितीचा अधिकार, नागरिकांचे अधिकार व कर्तव्ये याबाबत जनजागृतीचे कार्य संस्था करत असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष राम आखरे यांनी मांडले.
 
 
 
लेखक डॉ. हरिदास आखरे यांनी आपल्या मनोगतातून या अनुवादग्रंथाच्या वैचारिक काव्यात्म आव्हाने तसेच हिंदी काव्याचे मराठी भावविश्वात रूपांतर करताना आलेले अनुभव अत्यंत प्रांजळपणे मांडले. अटलजींच्या कवितांमधील राष्ट्रनिष्ठा, मानवी संवेदना व लोकशाही मूल्ये मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
अध्यक्षीय भाषणात दादासाहेब झोडे यांनी सांगितले की, राष्ट्राला समर्पित विचारांतून साकार झालेल्या स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मराठीत भावानुवाद करून डॉ. हरिदास आखरे यांनी राष्ट्रीय विचारधारेचा मराठी वाचकांपर्यंत प्रभावी संवाद साधला आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नागपूरसारख्या शहरात या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडणे हा सुंदर योगायोग असल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश खर्चे, श्रीधर ऊगले, प्रमोद वानखेडे, प्रभाकर महल्ले, प्रल्हाद खरसणे पाटील आदी कार्यकर्ते संख्येने उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात दादासाहेब झोडे यांनी सांगितले की, राष्ट्राला समर्पित विचारांतून साकार झालेल्या स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचे मराठीत भावानुवाद करून डॉ. हरिदास आखरे यांनी राष्ट्रीय विचारधारेचा मराठी वाचकांपर्यंत प्रभावी संवाद साधला आहे.
Powered By Sangraha 9.0