मार्डी परिसरात लंगड्या वाघाचे दर्शन

30 Dec 2025 17:06:04
तभा वृत्तसेवा
मारेगाव, 
sighting-of-the-lame-tiger : शेतात हरभèयाच्या पिकाला पाणी देत असताना अगदी 100 फुटावरच पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. वाघ शेतकèयाकडे येताना दिसताच शेतकèयाने प्रसंगावधान साधून शेतामध्ये असलेल्या बंड्यामध्ये स्वतःला कोंडून घेत बंड्याचा दरवाजा आतून बंद करून स्वतःचा जीव वाचवला. ‘दैव बलवत्तर म्हणूनच शेतकरी वाचला’ अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
 
 
 
lame tiger
 
 
 
तालुक्यातील हिवरा येथील शेतकरी तथा शिवसेना (उबाठा) गटाचे नेते पुरुषोत्तम बुटे यांची गोरज शिवारामध्ये शेती आहे. नेहमीप्रमाणे ते शेतामध्ये असलेल्या हरभèयाच्या पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले होते. हरभèयाच्या पिकाला पाणी देत असताना समोर त्यांना पट्टेदार वाघ दिसला. हा पट्टेदार वाघ लंगडत शेतकरी पुरुषोत्तम बुटे यांच्याकडे येत होता. वाघ अगदी 100 फुटावरच असल्याने शेतकèयाची घाबरगुंडी उडाली. परंतु शेतकèयाने प्रसंगावधान साधून स्वतःला शेतामध्ये असलेल्या बंड्यामध्ये घेतले आणि आतून बंड्याचा दरवाजा लावला. त्यामुळे शेतकèयाचा जीव वाचला. त्यांनी लगेच वन विभागाला फोन करुन घटनेची माहिती दिली. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. याआधीही मार्डी परिसरातील दांडगाव, गोरज, आपटी या शिवारामध्ये अनेकांना वाघाचे दर्शन झाले होते. त्यावेळी वाघासोबत पिल्लेही सोबत होते.
दैव बलवत्तर म्हणूनच वाचलो
 
 
मी शेतामध्ये पाणी देत असतानाच अचानक समोर पट्टेदार वाघ दिसला. समोर वाघाला बघताच माझी घाबरगुंडी उडाली. वाघ लंगडत माझ्याकडे येत आहेत असे पाहून मला भीती वाटली आणि मी लगेच शेतात असलेल्या बंड्यात गेलो. बंड्याचा दरवाजा आतमधून लावून घेतला. वाघ लंगडत होता. याचा अर्थ कुण्यातरी शेतात वाघाला करंट लागलेला असावा असाही अंदाज आला. परंतु माझे दैव बलवत्तर होते म्हणूनच मी वाचलो, अशी प्रतिक्रिया शेतकरी पुरुषोत्तम बुटे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0