नागपूर,
nagpur-temperature : थंडीच्या तीव्र लाटेमुळे नागपूरकर कमालीचे त्रस्त असताना मंगळवारी पारा पुन्हा घसरला. उपराजधानी नागपूर शहराचा पारा ८.६ अंशांवर असून थंडीची तीव्र लाटेमुळे नागपूर सर्वात थंड शहर झाले आहे. विदर्भातील सर्व अकराही जिल्ह्यांच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नागपूरच्या तापमानात पुन्हा घट होऊन पारा ८.६ अंशांवर असून सरासरी कमी आहे. जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेशसह पहाड़ी भागांमध्ये सध्या बर्फवृष्टी सुरू आहे. त्याच्या प्रभावामुळेच विदर्भात गार वारे वाहून तापमानात घसरण होत आहे. यंदाच्या हिवाळ्यात थंडीचा अधिक प्रभाव जाणवत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.
मुख्यत: सर्वाधिक थंड असलेल्या चिखलदर्यालाही नागपूरने मागे टाकले आहे. थंडीच्या बाबतीत नागपूर शहराने आता चिखलदर्यालाही टाकले आहे. हवेतील गारठा व थंडीची लाट २ जानेवारीपर्यंत कायम राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.