‘डिजीटल अरेस्ट’मध्ये अडकलेल्यानंतर पैसे मिळाले परत

30 Dec 2025 14:35:09
अनिल कांबळे
नागपूर,
Digital Arrest : एका माेठ्या गुन्ह्यात आराेपी म्हणून नाव समाेर आल्याचे सांगून एका निवृत्त कर्मचाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी सीबीआयच्या नावावर डिजीटल अरेस्ट केल्याचा बनाव केला. त्यानंतर त्या कर्मचाèयाकडून 37 लाख रुपये उकळले हाेते. सायबर पाेलिसांनी तपासात सायबर गुन्हेगारांच्या घशातून 14 लाख रुपये परत मिळवले.
 
 
ngp
 
 
सौजन्य: AI  
 
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेके असे सायबर ठगांनी केलेल्या फसवणुकीला बळी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. काेराडी येथील औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून निवृत्त झालेल्या रामटेके यांना काही महिन्यांपूर्वी एक फोन आला. त्यावर सायबर गुन्हेगारांनी रामटेके यांना डिजिटल अरेस्टची भिती दाखवत त्यांच्याकडून वेगवेगळ्या खात्यांमध्ये 37 लाख रुपये उकळले. नेहमी व्हिडिओ काॅल फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामटेके यांनी सायबर पाेलिसांत धाव घेतली. पाेलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पहात ज्या खात्यांवर रक्कम वळती झाली त्याचे क्रमांक मिळवले.
 
 
सायबर शाखेचे पाेलिस हवालदार साैरभ हिवरकर यांनी या प्रकरणात सखाेल तपास करत राजस्थानातील जयपूर येथून सायबर गुन्हेगार वसीम शेख याला अटक केली. पाेलिसांनी त्याच्या खात्यातून 14 लाख रुपयांची फसवणुकीची रक्कम जप्त केली. त्याच्या विराेधात न्यायालयात आराेपपपत्र दाखल केले. न्यायालयाने त्यावर निकाल देत सायबर गुन्हेगारांनी ठगवलेल्या रामटेके यांना फसवणुकीची रक्कम परत करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सायबर शाखेने रविवारी रामटेके यांना 14 लाखाची रक्कम सुपूर्द केली. सायबर गुन्हेगारांनी हडपलेली रक्कम परत मिळाल्यानंतर त्यांना सुखद धक्का बसला.
Powered By Sangraha 9.0