एनडीएचटीए झोनल टेनिसमध्ये एसटीए अकॅडमीचा ठसा

30 Dec 2025 17:59:18
नागपूर ,
NDHTA Zonal Tennis Tournament राम नगर येथे पार पडलेल्या एनडीएचटीए झोनल टेनिस स्पर्धेत एसटीए अकॅडमीच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले. संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंची मेहनत, शिस्त व जिद्द ठळकपणे दिसून आली.
 
 
87
 
१७ वर्षांखालील मुलींच्या गटात इन्सियाह हिने अंतिम फेरीत सुरमयी साठे हिचा पराभव करत विजेतेपद पटकावले. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात रितिका देशपांडे हिने इन्सियाह कमालवर ६–२ असा विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. १४ वर्षांखालील मुलांच्या गटात अंश पटेल याने उत्कृष्ट खेळ करत उपविजेतेपद मिळवले.तसेच तक्षील जांभुळकर याने उपांत्य फेरीत, तर निहित मुरारका याने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. NDHTA Zonal Tennis Tournamentया यशामागे प्रशिक्षक सचिन पाटील, तसेच वैभव कुंभरे, चेतन उके, आयुष व संपूर्ण STA परिवाराचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रशिक्षकांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
 
सौजन्य:वैभव कुंभारे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0