आ. कुणावारांच्या निवासस्थानी आशीर्वाद सोहळा!

30 Dec 2025 20:40:43
हिंगणघाट,
sameer-kunawar : आ. समीर कुणावार यांच्या नेतृत्वात लढलेल्या नगर पालिका निवडणुकीत नगराध्यक्षांसह भाजपाचे नगरसेवक निवडून आले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर व नगरसेवकांचा स्वागत, आशीर्वचन व पदग्रहण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि ऐतिहासिक ठरले. आ. कुणावार यांच्या जनसंपर्क कार्यालयात स्वागत व आशीर्वाद सोहळ्याने पदग्रहण सोहळ्याची सुरुवात झाली.
 
 
hgt
 
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ऊर्जा लाभावी यासाठी परमेश्वराचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करण्यात आली. यात आ. कुणावार यांच्या पत्नी श्रद्धा यांनीही नवनियुत नगराध्यक्षांचे स्वागत केले.
 
 
काल केसरीया रंगाची सजावट करण्यात आलेल्या सभामंडपात पूजेनंतर आ. समीर कुणावार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर, सिंदी (रेल्वे) येथील नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष राणी कलोडे, हिंगणघाट व सिंदी (रेल्वे) नगरपरिषदांचे भाजपा,—आर.पी.आय. (अ) महायुतीचे नगरसेवक व मान्यवर नगरपरिषदेत पोहोचले. हा क्षण हिंगणघाटच्या प्रशासकीय इतिहासातील मैलाचा दगड ठरला.
 
 
यावेळी डॉ. नयना तुळसकर यांनी आ. कुणावार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यत केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विकासकामे, नागरी सुविधा, शैक्षणिक विकास, मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम केले जाईल, असे सांगितले. आ. कुणावार यांनी केलेल्या विकास कामांची छाप नगरपरिषदेच्या माध्यमातून प्रत्यक्षात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल, असे नगराध्यक्ष डॉ. नयना तुळसकर यांनी सांगितले.
Powered By Sangraha 9.0