धुक्यामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम

30 Dec 2025 20:49:03
नागपूर,
flight-schedules : गत महिनाभर तांत्रिक कारणांमुळे अचानक विमान रद्द होण्याचे प्रकार झाले असताना आता थंडीबरोबरच धुक्याचा फटका विमान सेवेला बसत आहे. अनेक विमानसेवेला विलंब होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय नागपूर विमानतळावरून दिल्ली, पुणे, मुंबई हवाई मार्गावरील इंडिगोच्या प्रवाशांना प्रतिक्षा लागली. इतर मार्गावर सुध्दा हीच गत असल्याने काही फ्लाइट्स प्रभावित झाल्या.
 
 
indigo
 
 
दाट धुक्यामुळे काही दिवसांपासून नागपुरात येणार्‍या विमानांना विलंब होत आहे. इंडिगो एअरलाइन्सचे दिल्ली-नागपूर विमान रद्द होत असल्याने रेल्वेतून प्रवास करण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. अचानक विमान रद्द झाल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करताना गैरसोयींचा सामना करावा लागला.
 
 
धुक्यामुळे काही दिवसांपासून दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमानसेवा सातत्याने प्रभावित होत आहेत. इंडिगो विमान सेवेचा सामना करता करता थंडीत प्रवाशांचा घाम निघत आहे. उत्तर भारतात पडणार्‍या धुक्यामुळे विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
Powered By Sangraha 9.0