वाहतूक पाेलिसांनी केली 20 हजारांवर जड वाहनांवर कारवाई

30 Dec 2025 14:31:13
अनिल कांबळे
नागपूर, 
action against heavy vehicles : जड वाहतूक आणि खासगी बसेसमुळे (ट्रॅव्हल्स) शहरात ठिकठिकाणी वाहतूक काेंडी हाेत असल्यामुळे नागपूरकर त्रस्त झाले हाेते. त्यामुळे वाहतूक पाेलिसांनी विशेष अभियान राबवून तब्बल 20 हजार 900 जड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली तर जवळपास 300 खासगी बस चालकांवर गुन्हे दाखल केले. वाहतूक पाेलिसांच्या आक्रमक भूमिकेमुळे अवैध प्रवासी वाहतूक आणि जड वाहतूक करणाèयांवर वचक निर्माण झाला आहे.
 
 
Traffic
 
 
 
शहरात गेल्या काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्थाही बिघडली हाेती. त्यामुळे पाेलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांनी काही विशेष अभियान राबविण्यास सुरुवात केली. त्याचा सकारात्मक परिणाम दिसले. त्यानंतर शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक नीट करण्यासाठी ‘यू-टर्न’ हे विशेष अभियान राबविले. त्यामध्ये जवळपास दहा झाेन आणि भरारी पथकांचा समावेश हाेता. शहरातून बाहेर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स ठिकठिकाणी थांबे घेतात. त्यामुळे त्या रस्त्यावर वाहतूक काेंडी निर्माण हाेत हाेती. सीताबर्डी वाहतूक विभागात यशवंत स्टेडियम परिसर, बाेले पेट्राेल पम्प, व्हेरायटी चाैक, कृपलानी चाैक, साेनेगाव, विमानतळ चाैक तसेच सेंट्रल एव्हेन्यूवरील अग्रेसन चाैक, बैद्यनाथ चाैक, सक्करदरा चाैक, या परिसरात माेठ्या प्रमाणात ट्रॅिफक जॅम लागत असल्याने नागरिक त्रस्त हाेते.
 
 
 
त्यामुळे पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी ‘ऑपरेशन यू-टर्न’ राबवले. इनर रिंग राेडच्या आत खासगी पार्कींगवर बंदी घातली. तसेच नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 300 ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. 20 ट्रॅव्हल्सचे थेट परवाने रद्द केले. यासाेबतच 2 बस कंपन्यांचे ब्लॅकलिस्टींग प्रस्तावही सादर करण्यात आला. यासाेबतच आऊटर रिंग राेडच्या आत सकाळी 6 ते रात्री 10 वाजताच्या सुमारास जड वाहनांना शहरात बंदी घालण्यात आली. त्यानंतर मर्यादित वेळत प्रवेश दिलेल्या वाहनांवरही लक्ष ठेवण्यात आले. शहरात 20 हजार 900 जड वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. वाहतूक पाेलिसांच्या आक्रमक धाेरणामुळे वाहतूक काेंडीवर नियंत्रण मिळवले आहे.
 
 
रॅश ड्रायव्हिंग करणारे लक्ष्य
 
 
शहरात रॅश ड्रायव्हिंग करुन अन्य वाहनचालक किंवा पादचाèयांच्या जीवाशी खेळणाèयांची संख्या वाढली हाेती. त्यामुळे वाहतूक पाेलिसांनी अतिवेगात वाहन चालविणारे, चुकीच्या दिशेने वाहन चालविणारे, निष्काळजीपणे वाहन चालविणाèयांना लक्ष्य केले. दरराेज 60 पेक्षा जास्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. आतापर्यंत 880 प्रकरणांची नाेंद केली असून त्यांना ताब्यात
घेऊन थेट वाहने जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.
  
 
शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि रस्ते अपघातात घट व्हावी म्हणून ‘ऑपरेशन यू-टर्न’ राबविण्यात आले. या अभियानाला घवघवित यश मिळाले असून यापुढेही अभियान कायम ठेवण्यात येत आहे. याचे यशाचे सर्व श्रेय आमच्या प्रत्येक वाहतूक पाेलिस अंमलदारांना जाते.
- लाेहित मतानी (पाेलिस उपायुक्त, वाहतूक शाखा)
Powered By Sangraha 9.0