उमरखेड पं. स. कर्मचाऱ्यांची राज्यस्तर निवड

30 Dec 2025 18:44:52
तभा वृत्तसेवा
उमरखेड, 
umarkhed-panchayat-samiti : उमरखेड पंचायत समितीमधील कर्तव्यनिष्ठ व गुणवंत शिक्षक दिगंबर तडोळे जिल्हा परिषद शाळा, हातला (नवीन) यांनी शिक्षकांसाठी आयोजित वादविवाद स्पर्धेत विभाग स्तरावर उत्कृष्ट यश संपादन करून राज्यस्तरावर निवड मिळवली आहे.
 
 
 
y30Dec-Umarkhed
 
 
संत गाडगेबाबा आश्रमशाळा, ढाणकीचे विशाल गिरी यांनी शिक्षक वक्तृत्व स्पर्धेत विभाग स्तरावर प्रभावी कामगिरी करत राज्यस्तरावर स्थान मिळविले. हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण शिक्षण क्षेत्रासाठी, उमरखेड पंचायतसाठी व शिक्षक बांधवासाठी अभिमानास्पद आहे. त्यांच्या विचारांची स्पष्टता, अभ्यासपूर्ण मांडणी, प्रभावी वक्तृत्व आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून शिक्षकांची बौद्धिक उंची अधोरेखित झाली आहे.
 
 
विद्यार्थ्यांना घडवणाèया शिक्षकांनी स्वतः स्पर्धात्मक व्यासपीठावर यश मिळवून आदर्श शिक्षक हा केवळ शिकवणारा नाही तर सतत शिकणारा असतो. हे प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केले आहे. राज्यस्तरावर ते आपल्या ज्ञानसंपन्न विचारांनी व प्रभावी अभिव्यक्तीने निश्चितच वेगळा ठसा उमटवतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. दिगंबर तडोळे व विशाल गिरी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Powered By Sangraha 9.0