ब्लँकेट वाटप मोहीम यशस्वी बेघर नागरिकांना मदत !

31 Dec 2025 15:08:31
नागपूर,
Amar Swaroop Foundation पर्यावरण नीति व्हॅल्यूज, अमर स्वरूप फाउंडेशन व अन्विती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लँकेट वाटप मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. सिव्हिल लाईन्स परिसरातील ऑटोमोटिव्ह चौक ते संविधान चौक व मीठा नीम दर्गा परिसरात १०० बेघर नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
 

rama
 
 
 
या उपक्रमासाठी आवश्यक ब्लँकेट अमर स्वरूप फाउंडेशन व अन्विती फाउंडेशन यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आले. हिवाळ्यात रात्रीच्या वेळी तापमानात होणारी घट लक्षात घेता, उघड्यावर राहणाऱ्या गरजू नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळावा, या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात आली. Amar Swaroop Foundation संस्थेच्या स्वयंसेवकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर जाऊन गरजू नागरिकांपर्यंत मदत पोहोचवली. या सामाजिक उपक्रमासाठी पर्यावरण नीति व्हॅल्यूजने सर्व भागीदार संस्था, स्वयंसेवक व देणगीदारांचे आभार मानले.
 
सौजन्य:संजीवनी येवले,संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0