तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
spruha-joshi : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे सध्याचे जे वय आहे, ते नवनवीन काही शिकायचे आहे. त्यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली. कारण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांतीलच एक असल्याने मी त्यांना जवळची वाटल्याचे मत सिनेअभिनेत्री स्पृहा जोशी यांनी व्यक्त केले. त्या बुधवार, 31 डिसेंबर रोजी झालेल्या पत्रपरिषदेत बोलत होत्या. यावेळी जगदंबा अभियांत्रिकीचे सचिव डॉ. शितल वातीले उपस्थित होते.
जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन ‘विंग्स 26’ चे आयोजन करण्यात आले होते. बुधवार, 31 डिसेंबरला बक्षिस वितरण सोहळ्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीची सुप्रसिद्ध सिनेतारिका स्पृहा जोशी आल्या होत्या. सोहळ्यानंतर झालेल्या पत्रपरिषदेत जोशी म्हणाल्या, यवतमाळात नाट्यगृह होत आहे. चांगली गोष्ट आहे. संधी मिळाली तर यवतमाळच्या नाट्यगृहातसुद्धा प्रयोग करीन. जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय खूप सुंदर आहे. त्या बुधवारी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमासाठी आल्या होत्या.
यावेळी विद्यार्थ्यांसोबत मी विविध विषयांवर संवाद केला. त्यांना माझे अनुभव सांगितले, हे विद्यार्थ्यांचे क्रांती करायचे दिवस आहेत, काहीतरी नवीन करायचे काहीतरी शिकायचे आहे. त्यामुळे त्यांना शिक्षणासोबत मुक्त संचारसुद्धा करू देणे गरजेचे आहे. जगदंबा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनातून त्यांना मुक्त संचार करता येतो. यातून त्यांना व्यासपीठावर कसे बोलायचे, हे शिकता येते. मला यवतमाळला येऊन खूप छान वाटले, असे स्पृहा जोशी म्हणाल्या.