तभा वृत्तसेवा
दारव्हा,
stray-dogs : शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून लहान मुलांसह अनेकांना चावा घेऊन हल्ले केले आहे. त्यांच्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. दारव्हा शहरातील बहुतेक भागात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. ही मोकाट कुत्रे रस्त्याच्या मधोमध बसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. त्यामुळे अपघाताची शक्यता राहते. शिवाय रस्त्याने जाणाèया, येणाèया लहान मुलांना, शाळकरी मुलांना चावा घेतात. त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.
विशेष म्हणजे, दारव्ह्यातील जैन मंदिर, गणेश ज्वेलर्स, मानपूरा चौक तसेच अंबादेवी मंदिराकडे जाणारा रस्ता या भागात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणात आहेत. विशेष म्हणजे, हा रस्ता अतिशय रहदारीचा आहे. त्यामध्ये हे मोकाट कुत्रे त्रास देतात. त्यासंबंधी अनेकवेळा तोंडी तक्रारी झाल्या, परंतु त्यावर कार्यवाही झाली नाही. आता हा विषय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हाती घेतला असून मनसेचे तालुकाध्यक्ष लाला पांडे यांनी मुख्याधिकाèयांना निवेदन दिले आहे. या संबंधात बंदोबस्त न झाल्यास आंदोलनाची तयारी दर्शविली आहे.