गीता जयंती व शौर्य दिनाचे आयोजन

31 Dec 2025 19:24:13
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
Gita Jayanti-Shaurya Din : विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने शौर्य दिवस संपूर्ण देशभरात साजरा करतात. या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद, बजरंग दल दारव्हा प्रखंडाच्या वतीने स्थानिक कविता मंगल कार्यालय येथे गीताजयंती शौर्यदिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने शहराच्या प्रमुख मार्गाने बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पथसंचलन काढले होते. शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करत पथसंचलनाचे कविता मंगल कार्यालयात समापन झाले. यावेळी विशाल धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेला प्रमुख आशीर्वचन म्हणून विशाल बढे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. रुपेश खंदाडे, प्रमुख वक्ते म्हणून विश्व हिंदू परिषदेचे प्रांतसेवा प्रमुख राम लोखंडे, विशेष उपस्थिती म्हणून बजरंग दलाचे प्रांत सुरक्षा प्रमुख सागर खेडकर, विभाग संयोजक भूपेंद्र परिहार, जिल्हा धर्मप्रसार प्रमुख आशिष सावरकर, प्रखंड अध्यक्ष दिनेश कोठारी व्यासपीठावर उपस्थित होते.
 
 
y31Dec-Bajrang
 
यावेळी विशाल बढे, रुपेश खंदाडे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. प्रमुख वक्तेराम लोखंडे यांनी विशाल धर्मसभेला संबोधित करताना श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या शौर्य आणि पराक्रमाच्या यशोगाथा उपस्थितांसमोर मांडल्या. देव, देश, धर्म रक्षणासाठी हिंदू तरुणांनी बजरंग दलात सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा सहसंयोजक ओम ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक बजरंग दल प्रखंड संयोजक अनिकेत गावंडे यांनी केले. तर आभारप्रदर्शन गणेश मांडवगडे यांनी केले. यावेळी विश्व हिंदू परिषद प्रखंड सहमंत्री राहुल निरडवार, बजरंग दल सहसंयोजक आदर्श धोटे, विद्यार्थी प्रमुख विवेक मनगटे, बलोपासना प्रमुख शंकर राठोड व तसेच प्रखंड आणि नगरातील असंख्य नागरिक तथा कार्यकर्ते उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0