नागपूर,
Hadas Primary School लिबरल एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित हडस प्रायमरी स्कूल (स्टेट बोर्ड), रामदासपेठ, नागपूर येथे दिनांक २९ डिसेंबरला वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध वैयक्तिक व सांघिक स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
धावणे, रिले रेस, अडथळा शर्यत, डॉज बॉल, बास्केटबॉल आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. कासखेडीकर यांनी विजेत्यांना प्रमाणपत्रे, पदके व ट्रॉफी प्रदान केल्या.Hadas Primary School क्रीडा शिक्षिका डॉ. सारिका जोशी यांनी स्पर्धांचे आयोजन केले. संस्थेचे सचिव निलेश साठे व कोषाध्यक्ष विनय लाडकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र