नागपूर ,
Karmannai School of Excellence कर्मण्नेय स्कूल ऑफ एक्सिलेन्स, बुटीबोरी येथे नागपूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या सहकार्याने के.एस.ई. मॅरेथॉन या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा उपक्रम श्री साईकृपा किसान एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा प्रतिभा घाटे व शाळेच्या संचालिका प्रीती एस. कानेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
या मॅरेथॉनचे उद्घाटन संकल्प घाटे, डॉ. उन्नती दातार व युवराज घाटे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत ओपन, १८, १४ व ८ वर्षांखालील अशा विविध वयोगटांतील मुला-मुलींच्या शर्यती घेण्यात आल्या. एकूण ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट सहनशक्ती व क्रीडास्पिरीटचे दर्शन घडवले. Karmannai School of Excellence स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्रे, पदके व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या मॅरेथॉनमुळे युवकांमध्ये क्रीडावृत्ती, शिस्त व शारीरिक तंदुरुस्तीला चालना मिळाली. यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या वतीने नितीन ढाबेकर व संपूर्ण के.एस.ई. टीमचे विशेष आभार मानण्यात आले.
सौजन्य:डॉ. उन्नती दातार,संपर्क मित्र