नवी दिल्ली,
liquor-sales-on-new-year २०२६ च्या स्वागतासाठी देशभरात जल्लोषाला सुरुवात झाली असून ३१ डिसेंबरच्या रात्री विविध शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या सेलिब्रेशनमध्ये दारूची मागणी नेहमीच मोठी असते आणि दरवर्षी नववर्षाच्या निमित्ताने देशभरात कोट्यवधी रुपयांची दारू विकली जाते. मागील वर्षी तर केवळ एका रात्रीत दारू विक्रीतून शेकडो कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची नोंद झाली होती. विशेषतः केरळ, तेलंगणा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये दारूची मागणी उच्चांकावर असल्याचे चित्र दिसून आले.
२०२५ च्या सुरुवातीआधी तेलंगणा राज्याने दारू विक्रीत विक्रम प्रस्थापित केला होता. liquor-sales-on-new-year ३० आणि ३१ डिसेंबर रोजी राज्यात अनुक्रमे ४०२ आणि ४०१ कोटी रुपयांची विक्री झाली, जी सरासरी रोजच्या सुमारे १०० कोटी रुपयांच्या विक्रीपेक्षा तब्बल आठ पटीने अधिक होती. हैदराबादसह रंगारेड्डी आणि मेदचल या परिसरात बार आणि रेस्टॉरंट्समध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. या दोन दिवसांत राज्य सरकारच्या तिजोरीतून ८०० कोटी रुपयांहून अधिक महसूल जमा झाला.
कर्नाटकातही नववर्षाचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. विशेषतः बेंगळुरू शहर आपल्या पब आणि पार्टी संस्कृतीसाठी ओळखले जाते. २८ डिसेंबर २०२४ रोजी एका दिवसातच राज्यात ४०९ कोटी रुपयांची दारू विकली गेली होती. नववर्षाच्या काळात सुमारे ४.८३ लाख बॉक्स दारू आणि २.९२ लाख बॉक्स बीयरची विक्री झाली असून एकूण व्यवहार ३०८ कोटी रुपयांच्या पुढे गेला.
आंध्र प्रदेशमध्येही २०२५ च्या नववर्षी दारू विक्रीत मोठी वाढ झाली. liquor-sales-on-new-year त्या वर्षी सुमारे ३०० कोटी रुपयांची दारू विकली गेली, जी मागील वर्षाच्या तुलनेत जवळपास दुप्पट होती. विशाखापट्टणम शहरात एकट्या ३१ डिसेंबर रोजी ११ कोटी रुपयांची विक्री झाली. विक्री वाढवण्यासाठी राज्य सरकारने बार आणि किरकोळ दुकानांची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
दिल्ली आणि नोएडा परिसरातही नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. २०२५ च्या स्वागतावेळी दिल्लीत सुमारे ४०० कोटी रुपयांची दारू विकली गेली. हॉटेल्स, बार आणि खासगी पार्ट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मद्यसेवन झाले. नोएडामध्ये ३१ डिसेंबर २०२४ आणि १ जानेवारी २०२५ या दोन दिवसांत सुमारे १६ कोटी रुपयांची दारू विक्री नोंदवण्यात आली.
केरळमध्ये मात्र नववर्षापेक्षा ख्रिसमसच्या काळात दारू विक्री अधिक झाल्याचे दिसून आले. liquor-sales-on-new-year २४ आणि २५ डिसेंबर रोजी राज्यात १५२ कोटी रुपयांची दारू विकली गेली, तर नववर्षाच्या रात्री १०८ कोटी रुपयांची विक्री झाली. कोची येथील पलारिवट्टम–रवीपुरम येथील एका आऊटलेटमध्येच तब्बल ९२.३१ लाख रुपयांची विक्री झाल्याची नोंद आहे. या आकडेवारीवरून नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान दारू विक्रीचा व्यवसाय किती मोठ्या प्रमाणावर होतो, हे स्पष्ट होते.