पुसद पत्रकार संघातर्फे 6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचे आयोजन

31 Dec 2025 19:36:38
तभा वृत्तसेवा
पुसद, 
journalists-day : लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचे मूल्य अधोरेखित करणारा मराठी पत्रकार दिन पुसद पत्रकार संघाच्या वतीने मंगळवार, 6 जानेवारी रोजी संध्याकाळी 5.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त ज्येष्ठ पत्रकार प्रदीप देशपांडे (अमरावती) व अविनाश दुधे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
 
 
 
ytl
 
 
 
देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अ‍ॅड. नीलय नाईक राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मोहिनी इंद्रनील नाईक यांची उपस्थिती राहणार आहे. मोहिनी नाईक यांचाही पुसद पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
 
 
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष ललित सेता, सचिव हरीप्रसाद विश्वकर्मा, उपाध्यक्ष अमोल व्हडगिरे, कोषाध्यक्ष रुपेंद्र अग्रवाल, सहसचिव ज्ञानेश्वर शिंदे तसेच कार्यकारिणी सदस्य प्रा. दिनकर गुल्हाने, रवी देशपांडे, अखिलेश अग्रवाल, अनिल चेंडकाळे, योगेश राजे, कैलास जगताप, राजू दुधे, गणेश राठोड यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0